पंतप्रधान पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 असून सन 2022-23 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे.
याबाबतीत पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत काही माहिती समोर आली होती.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
परंतु शासनाच्या इ पीक पाहणी मध्ये पिक पेरा नोंद घेण्यासाठीची कार्यवाही ही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे.
या योजनेमध्ये सहभाग घेत असताना बऱ्याच वेळेस पिकाचा विमा काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यांमध्ये फरक आढळतो. त्यामुळे बरेच शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहतात.
शेतकऱ्यांनी शेतामध्ये घेतलेले पीक विमा हप्ता भरताना नोंदवलेले पिक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्याने ई पीक पाहणी मध्ये पिकाची केलेली नोंदणी अंतिम धरण्यात येईल असा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्यामुळे पीक विमा योजनेत सहभाग घेताना इ पीक पाहणी मध्ये पिकांची नोंद असलेला दाखला असण्याचे आता आवश्यकता नाही.
शेतकरी पिक विमा बाबत स्वयंघोषणापत्राद्वारे या योजनेत सहभागी होऊ शकतात मात्र एक ऑगस्ट 2022 नंतर ई पीक पाहणी मध्ये पिकांची नोंद करावी असे आवाहन करण्यात येत आहे. याबाबतची माहिती कृषी आयुक्त धीरजकुमार महाराष्ट्र राज्य यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे.
Share your comments