1. बातम्या

कौतुक करावे तेवढे कमीच….! बळीराजाने पक्षांसाठी मोकळे सोडले एक एकर बाजरीचे शेत

भारतात शेतकऱ्याला शेतकरी राजा म्हणुन संबोधले जाते. बळीराजा (Farmer) संपूर्ण जगाचा पालन पोषण करणारा अन्नदाता म्हणून ओळखला जातो. आपल्या अपार कष्टांनी सोन्यासारखा शेतमाल उत्पादित करून संपूर्ण जगाचं पोट भरणारा बळीराजा माणूसकीचा मृतीवंत पुतळा म्हणून का ओळखला जातो याची अनेक उदाहरणे वेळोवेळी आपल्या समोर येत असतात.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
sparrow eating

sparrow eating

भारतात शेतकऱ्याला शेतकरी राजा म्हणुन संबोधले जाते. बळीराजा (Farmer) संपूर्ण जगाचा पालन पोषण करणारा अन्नदाता म्हणून ओळखला जातो. आपल्या अपार कष्टांनी सोन्यासारखा शेतमाल उत्पादित करून संपूर्ण जगाचं पोट भरणारा बळीराजा माणूसकीचा मृतीवंत पुतळा म्हणून का ओळखला जातो याची अनेक उदाहरणे वेळोवेळी आपल्या समोर येत असतात. आज देखील बळीराजा का राजा आहे? आणि त्याला अन्नदाता म्हणून का संबोधले जाते याचीच एक झलक धारूर तालुक्यात बघायला मिळाली आहे.

तालुक्यातील मौजे आंबे वडगाव येथील रहिवासी शेतकरी मसु किसन वाघमोडे यांनी असं कौतुकास्पद कार्य केले आहे की सर्वत्र त्यांचीचं चर्चा रंगली आहे. वाघमोडे यांनी आपला एक एकर बाजरीचा प्लॉट पक्ष्याना खाण्यासाठी मोकळा सोडला आहे.

या व्यतिरिक्त वाघमोडे यांनी शेतात पक्ष्यासाठी पाण्याची देखील सोय करून ठेवली आहे. वाघमोडे यांनी दाखवलेली ही भूतदया निश्चितचं कौतुकास्पद आहे आणि त्यांचे यासाठी तालुक्यात नव्हे-नव्हे तर संपूर्ण राज्यात तोंडभरून कौतुक केले जातं आहे.

सध्या राज्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. यामुळे माणसासमवेतचं पशु-पक्ष्याना देखील मोठा त्रास सहन करावा लागतं आहे. पक्ष्यांना खाण्यासाठी अन्नाची पर्याप्त सोय नसल्यामुळे ते वण-वण फिरत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Poultry Farming Business: वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसाय आला डबघाईत; कोंबड्यांचे मृत्यूचे प्रमाण वाढले

…..अखेर फिक्स झालंच! या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना 50 हजार रुपये

यामुळे वारकरी संप्रदायाचे वाघमोडे यांनी आपला एक एकराचा बाजरीचा प्लॉट पक्ष्यांना खाण्यासाठी मोकळा केला आहे. यामुळे पक्ष्यांना निश्चितचं फायदा होणार आहे. वाघमोडे यांनी केलेलं हे कार्य निश्चितचं कौतुकास्पद आहे. श्रीमान वाघमोडे यांसारख्या विचारांच्या माणसाची खरी गरज आहे. वाघमोडे आपल्या कार्यातून महाराष्ट्राची संस्कृती जगासमोर मांडत असल्याची भावना लोक आता व्यक्त करत आहेत.

दरम्यान राज्यात तापमानात मोठी वाढ होत असल्याने पशु-पक्ष्यांना पाणी आणि खाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने त्यांच्यासाठी पाण्याची तसेच खाण्याची व्यवस्था करण्याची वाघमोडे यांचा हा निर्णय बळीराजाचा उदार स्वभाव अधोरेखित करीत आहे.

शेतकऱ्याला अन्नदाता कां म्हटलं जातं याचे हे एक उत्तम उदाहरण आहे असंच म्हणावं लागेल. वाघमोडे यांनी केलेल्या या कार्यामुळे भारताला चमत्काराची भूमी, स्वाभिमानाची भूमी, सन्मानाची भूमी, मान-वंदनाची भूमी असं का संबोधत जातं हे अधोरेखित झालं आहे.

English Summary: Not much to appreciate….! Baliraja left an acre of bajra field open for the parties Published on: 08 May 2022, 06:28 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters