1. बातम्या

मराठवाड्यातील या तीन जिल्ह्यांना रब्बी हंगामात नाही भासणार खतांचा तुटवडा

मागील काही महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम तर हातचा गेलेला आहे. परंतु शेतकरी बंधू आता जोमाने रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने देखील कंबर कसली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
fertilizer

fertilizer

 मागील काही महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम तर हातचा गेलेला आहे. परंतु शेतकरी बंधू आता जोमाने रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने देखील कंबर कसली आहे.

औरंगाबाद,बीड आणिजालना जिल्ह्यासाठी दोन लाख 95 हजार टन खताचा पुरवठा केला जाणार आहे. या तीनही जिल्हे मिळून जवळजवळ चार लाख टन खतांची मागणी करण्यात आली होती. परंतु रब्बी हंगाम अजून सुरू व्हायला वेळ असल्यामुळे उरलेला खताचा पुरवठा देखील केला जाणार असल्याचे औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सांगितले.

यात तिन्ही जिल्ह्यातून नोंदवण्यात आलेली खतांची मागणी

 कृषी विभागाकडून औरंगाबाद जिल्ह्यासाठी 1 लाख 86 हजार टन, जालना जिल्ह्यासाठी एक लाख नऊ हजार टन बीड जिल्ह्यासाठी एक लाख 35 हजार टन खतांची मागणी करण्यात आली होती. यामध्ये एक लाख 42 हजार टन युरिया, 46 हजार 798 टन डीएपी, 29 हजार 134 टन म्युरेट ऑफ पोटॅश, एक लाख 80 हजार टन एन पी के आणि 32 हजार 780 टन एस एस पीखताचा समावेश होता.

मागणीच्या मानाने सध्या पुरवठा कमी झाला असला तरी काही दिवसांमध्ये पूर्ण मागणीनुसार पूर्तता केली जाणार आहे.औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांत करिता रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. तीनही जिल्हे मिळून एक लाख 39 हजार 125 टन  विविध प्रकारचे खते तीनही जिल्ह्यात उपलब्ध आहेत.

( स्त्रोत-tv9 मराठी)

English Summary: not float to fertilizer in three marathwada district beed ,jalna,aurangabad Published on: 24 October 2021, 08:08 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters