1. बातम्या

सोयापेंड: सध्या सोयापेंड आयातीचा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही: केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल

piyush goyal

piyush goyal

यावर्षी सोयाबीनचे पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. अगदी सुरुवातीला सोयाबीन मार्केट मध्ये आल्यानंतर सोयाबीनला चांगला भाव मिळाले. परंतु कालांतराने सोयाबीनच्या भावात सातत्याने घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे

यामागे बरीचशी कारणे आहेत. त्यातील सगळ्यात महत्त्वाचे कारण होते ते सोया पेंडची आयात हे होय. या पार्श्वभूमीवर सोयाबीन पेंड ची आयात करू नये, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन  राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना दिले.

 यावर सोयाबीन पेंडच्या आयातीचा केंद्र सरकारचा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नसल्याची ग्वाही वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली.अशी माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.यावर्षी कुक्कुटपालन व्यवसायातून सोयापेंडची मागणी झाल्यावर केंद्र सरकारने 12 लाख टन सोयाबीन पेंड आयात करण्यास परवानगी दिली.

त्यानंतर ही आयात सप्टेंबर आणि ऑगस्टमध्ये झाल्यानंतर सोयाबीनचे दर कोसळले होते. परंतु यावर्षी तशी परिस्थिती नाही. कारण या वर्षी देशात एक कोटी 17 लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. यातील जवळजवळ बारा लाख टन सोयाबीनचे पेरणीसाठी शेतकरी पुढच्या हंगामासाठी ठेवतील. त्यातील उरलेल्या एक कोटी पाच लाख सोयाबीनच्या गाळप होऊन त्यापासून 86 लाख टन पेंड तयार होईल.कुक्कुटपालन व्यवसायातीलसोया पेंड गरजेचा विचार केला तर या उद्योगासाठी 60 लाख टन सोयाबीनची गरज असते. त्यामुळे सोयाबीन पेंड आयात करण्याची गरज नसल्याची बाब पियुष गोयल यांच्यापुढे ठेवण्यातआली.

 सोयाबीन पेंड साडेचार हजार रुपये भावाने मिळत असल्याने सोया पेंड आयात करण्याची मागणी कुकूटपालन उद्योगातून करण्यात आली आहे.

परंतु या वर्षी देशात 26 लाख टन जास्तीचे सोयाबीन पेंड शिल्लक राहणार आहे.या सोयाबीन पेंड चाभावजागतिक बाजारभावापेक्षा दहा टक्के अधिक असल्याने ही पेंड निर्यात होणार नाही. अशा परिस्थितीत जर सोयाबीन पेंड आयात केल्यास शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका बसणार आहे.ही बाबपियुष गोयल यांच्यासमोर ठेवल्यानंतर त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून तुम्ही ही बाब शेतकऱ्यांना सांगावी असे त्यांनी स्पष्ट केले.अशी माहिती पटेल यांनी दिली.(संदर्भ-सकाळ)

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters