1. बातम्या

आता तुम्ही पगाराव्यतिरिक्त एक रुपयाही जास्त लपवू शकणार नाही, वाचा नवीन नियम..

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अनेक वेगवेगळे नियम आणले जात आहेत. तसेच अनेक योजना देखील लागू केल्या जात आहेत. आता चालू वर्षी प्राप्तिकर विवरणपत्र (Income Tax Return) भरण्याची वेळ सुरू झाली आहे. आयकर विभाग (Income Tax Department) लोकांना सतत आयटीआर फाइलिंग डेडलाइनची वाट न पाहता त्वरित आयटीआर फाइल करण्यास सांगत आहे. यामुळे अनेकांची पळापळ सुरु झाली आहे.

not able hide even one more rupee apart from salary.

not able hide even one more rupee apart from salary.

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अनेक वेगवेगळे नियम आणले जात आहेत. तसेच अनेक योजना देखील लागू केल्या जात आहेत. आता चालू वर्षी प्राप्तिकर विवरणपत्र (Income Tax Return) भरण्याची वेळ सुरू झाली आहे. आयकर विभाग (Income Tax Department) लोकांना सतत आयटीआर फाइलिंग डेडलाइनची वाट न पाहता त्वरित आयटीआर फाइल करण्यास सांगत आहे. यामुळे अनेकांची पळापळ सुरु झाली आहे.

याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 आहे, असे असताना उशिराने कर भरणाऱ्यांसाठी एक बातमी आहे. यावेळेपासून आयटीआर फाइलिंगचे काही नियम (ITR Filing Rules) बदलण्यात आले आहेत. यामुळे ते माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा आयटीआर दाखल केल्यानंतरही तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळण्याची शक्यता आहे.

आता आयटीआर फाइलिंगमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तसेच करदात्यांना गोष्टी सोप्या करण्यासाठी विभागाने हे सुरू केले आहे. नवीन AIS फॉर्ममध्ये, करदात्यांना वेगवेगळ्या चॅनेलमधून मिळालेल्या सर्व कमाईचा तपशील देण्यात आला आहे. यामध्ये बचत खात्यातून मिळणारे व्याज, आवर्ती आणि मुदत ठेवींमधून मिळणारे उत्पन्न, लाभांश, म्युच्युअल फंड (mutual fund) यासह रोख्यांच्या व्यवहारातून मिळणारे उत्पन्न, परदेशातून मिळालेले पैसे आदींचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनो 'ही' टेक्निक वापरा आणि टॉमेटोमधून लाखो कमवा, जाणून घ्या...

यामुळे आता आयटीआर फाइल करणे सोपे करण्यासाठी, आयकर विभागाने TIS सुरू केले आहे. यामध्ये, करदात्यांना करपात्र रकमेची एकरकमी माहिती मिळते. यामध्ये पगारदार वर्ग, फॉर्म-16 च्या आधारे आयटीआर फाइल करतात. याशिवाय अनेक प्रकारचे उत्पन्न आणि भेटवस्तू देखील आयकराच्या कक्षेत येतात. इथेच AIS आणि TIS करदात्यांना उपयुक्त ठरतात.

देशात महागाई वाढणार! 18 जुलैपासून खिश्यात जास्तीचे पैसे ठेवा...

यामध्ये तुम्हाला पगाराव्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून मिळणार्‍या प्रत्येक उत्पन्नाचा तपशील मिळतो, जो आयकर कायदा 1961 अंतर्गत निर्दिष्ट केला आहे. यामध्ये एका आर्थिक वर्षात केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचे तपशीलवार विवरण म्हणता येईल. TIS हा याचा सारांश आहे. यामुळे तुम्ही आता तुम्ही पगाराव्यतिरिक्त एक रुपयाही जास्त लपवू शकणार नाही.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची नवीन घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार बक्षीस म्हणून ५० हजार
आनंदाची बातमी! 13 लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर, तब्बल 603 कोटींहून रक्कम जमा
Petrol Diesel Rates : आता पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होणार? पहा आजचे नवीन दर

English Summary: not able hide even one more rupee apart from salary, new rules.. Published on: 17 July 2022, 07:03 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters