1. बातम्या

ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री; विना अनुदानित सिलिंडर महागले

विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत बुधवारपासून वाढली आहे. आता विना अनुदानित एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये  ५९३ रुपयांऐवजी ५९४ रुपयांना मिळत आहे. तर मुंबईत याची किंमत १४.२ किलो वजनी सिलिंडरसाठी ४ रुपये २० पैसे अतिरिक्त द्यावे लागतील. मुंबईत सिलिंडरची किंमत ६२०.२० रुपये प्रति सिलिंडर असेल. तर कोलकाता आणि चेन्नईमध्येही एलपीजीची किंमत वाढली आहे.

याआधी दिल्लीत जूनमध्ये १४.२ किलोग्राम वजनी विना अनुदानित एलपीजी सिलिंडरचा दर ११.५० रुपयांनी वाढला होता. तर मे महिन्यात याची किंमत १६२.५० रुपयांनी कमी करण्यात आली होती. जर आपण १९ किलो वजनी गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत ११३९.५० रुपयांनी कमी होत ११३५ रुपयांवर आली होती. तर कोलकातामध्ये हे ११९७.५० रुपये असेल, तर मुंबईत १०९०.५० रुपये आणि चेन्नईत १२५५ रुपये प्रति सिलिंडर इतकी किंमत असेल. मार्चपासून ते आतापर्यंत एलपीजी सिलिंडर २११ रुपयांनी स्वत झाले आहे.

यावर्षी आतापर्यंत विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडर (१४.२ किलो वजनी) १२१ रुपयांपर्यंत स्वस्त झाले. एक जानेवारी २०२० ला १४.२ किलो वजनी घरगुती गॅसीची किंमत दिल्लीत ७१४ रुपये होती. आता याची किंमत ५९४ रुपये आहे. तर मार्च महिन्याची तुलना केली तर मार्च २०२० ला विना अनुदानित वाला एलपीजी सिलिंडर दिल्लीत ८०५ रुपयांनी मिळत आहे. या हिशोबाने आतापर्यंत सिलिंडर २११ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters