पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरें यांनी लिहिलेल्या शिवचरित्राबाबात खूप मोठे विधान केले आहे. शरद पवार म्हणाले, माझ्या मते शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही. असं वक्तव्यही शरद पवार यांनी केलं आहे. काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली, त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश होतो, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
'शिवचरित्र आणि विचारप्रवाह' या श्रीमंत कोकाटे लिखित पुस्तकाचं पुण्यामध्ये शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झालं. या कार्यक्रमाला कोल्हापुरचे शाहू छत्रपती, जयसिंगराव पवार आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात शरद पवारांनी शिवचरित्राबाबत हे वक्तव्य केले आहे.
बाप रे बाप! बाजारपेठेत मटनापेक्षा महाग मशरूम; जंगली मशरूमची होतेय चर्चा
बाबासाहेब पुरंदरे यांचा अल्पपरिचय Babasaheb Purandare
नाव : बळवंत मोरेश्वर पुरंदरे
जन्म : २९ जुलै १९२२
जन्मस्थळ : सासवड ( पुणे )
मृत्यू : १५ नोव्हेंबर २०२१
परिचय : इतिहास संशोधक आणि साहित्यिक
टोपणनाव बाबासाहेब पुरंदरे
बाबासाहेब पुरंदरें यांचे साहित्य – Babasaheb Purandare Books
राजा शिवछत्रपती, पुरंदऱ्याची दौलत, शेलारखिंड, सिंहगड, प्रतापगड, पुरंदऱ्यांचा सरकारवाडा, महाराज, राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, शेलारखिंड पन्हाळगड, आग्रा, अशी बाबासाहेब पुरंदरेंची साहित्यसंपदा फार व्यापक आहे. शिवचरित्रावर बाबासाहेबानी जवळजवळ बारा हजारांवर व्याख्यानं देऊन समाज जागृतीचं मोठं कार्य केलं.
Share your comments