राज्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न सध्या चांगलाच पेटला आहे. सध्या गाळप हंगाम संपत आला असून अजूनही ज्यांचा ऊस तुटला नाही, त्यांची मोठी पळापळ सध्या सुरु आहे. यामुळे त्यांची झोप उडाली आहे. सध्या देशात महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक उसाचे गाळप करून रेकॉर्ड केला आहे. असे असले तरी अजून मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप राहिले आहे. यामुळे हे शेतकरी चिंतेत आहेत. आतापर्यंत लोकप्रतिनीधी, प्रशासन यांनी ऊसतोडणीचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. यामुळे आता शेतकरीच आक्रमक झाले आहेत. तसेच यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
असे असताना आता मराठवाड्यात पुन्हा गुऱ्हाळ सुरु होत असल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना ऊसतोडणीची प्रतिक्षा होती पण साखर कारखान्यांचे बिघडलेले नियोजन आणि ऊसाचे वाढलेले क्षेत्र यामुळे ऊस फडातच राहिल या भीतीने गुळ निर्मिती करणाऱ्या गुऱ्हाळाची संख्या ही वाढू लागली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांनी हा एक पर्याय निवडला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला आहे, तसेच गुऱ्हाळ चालकांना ऊसही उपलब्ध होत आहे. तसेच गुऱ्हाळ चालकच ऊसतोडणी करत असल्याने साखर कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळासाठीची तोडणी परवडत असल्याचे शेतकऱ्यांचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे अनेकांनी हाच मार्ग स्वीकारला आहे. दरम्यान, प्रतिक्विंटल 1 हजार 800 ते 2 हजाराचा दर मिळत असून तोडणी ही गुऱ्हाळ चालकांकडेच आहे. यामुळे शेतकरी देखील याकडे वळाले आहेत. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान देखील कमी होत आहे. सध्या कारखान्यावर ऊस घालवण्यासाठी शेतकऱ्यांना ऊसतोड मजुरांना अधिकचे पैसे जेवण द्यावे लागत आहे.
एवढे करूनही वेळेत बिले दिली जात नाहीत. यामुळे गरजेच्यावेळी पैसे मिळत नाहीत. तसेच दुसरीकडे आता गुऱ्हाळ चालकांकडून ऊसाची तोड केली जात आहे. आणि ऊसतोड झाली की पैसे मिळत असल्याने शेतकरीही समाधानी आहे. चोख व्यवहारामुळे कारखान्याऐवजी गुऱ्हाळच परवडले अशी धारणा आता शेतकऱ्यांची होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात याकडे अजून शेतकरी वळतील. असे असले तरी मात्र गुऱ्हाळ ही काही ठिकाणी उपलब्ध नाहीत. यामुळे याचा काही ठिकाणच्या शेतकऱ्यांना लाभ घेता येत नाही.
ऊसतोडणीचा प्रश्न रखडल्यापासून अनेक ठिकाणी गुऱ्हाळांची संख्या वाढली आहे. नांदेडसह परिसरात गुऱ्हाळांची संख्या ही वाढत आहे. गुऱ्हाळावर नैसर्गिकरित्या गुळाची निर्मिती केली जात असल्याने ग्राहकही याच गुळाला पसंती देत आहेत. यामुळे मागणी देखील जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न मार्गी लागला असून गुऱ्हाळाच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला कामही मिळाले आहे. अनेकांनी बंद केलेली गुऱ्हाळे आता पुन्हा एकदा चालू केली आहेत. यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Share your comments