शहरात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील टोल रद्द केला जाईल असी घोषणा नितीन गडकरी यांनी राज्यसभेत केली आहे. त्यांचा हा निर्णय मोठा मानला जात आहे. शहरातील लोकांना 10 किलोमीटरच्या रस्त्याचा वापर करण्यासाठी 75 किलोमीटर रस्त्याचा टोल द्यावा लागतो. यामुळे याबाबत अनेकदा मागणी केली जात होती.
यामुळे आता या घोषणेमुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. देशातील टोल नाक्यांचा जनक मीच असल्याचे देखील गडकरी यावेळी म्हणाले. आम्ही 1990 च्या दशकात महाराष्ट्रात पहिल्यांदा मंत्री असताना त्या तत्त्वावर महामार्ग बांधल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आता आपण नवी पद्धत आणत आहोत. त्यामुळे शहरी भागातील लोकांना टोल भरण्यातून वगळलं जाईल, असेही ते म्हणाले.
नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी सर्व टोल प्लाझा हटवले जातील. रस्त्यावर कोणतीही टोल लेन नसेल. टोल वसूल करण्यासाठी GPS आधारित ट्रॅकिंग सिस्टम तयार केली जात आहे. ज्यात तुम्ही टोल प्लाझा पार केल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कापली जाईल, असे सांगितले होते. ही सुविधा देखील चालू झाली आहे.
केंद्राकडून मोठी सूचना! मंकीपॉक्सचा धोका वाढल्याने घेतला निर्णय..
10 किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशांना 75 किलोमीटरचा टोल द्यावा लागत असेल तर ते चुकीचे असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. पण यामध्ये माझी काही चूक नाही. ही गोष्ट दुरुस्त करण्याची गरज असल्याचे गडकरींनी सांगितले. मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टींशी मी सहमत असल्याचेही गडकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! यंदा उसाला मिळणार 3 हजार 50 रुपयांची FRP, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
खासदारांकडून टाळ्यांचा कडकडाट, सभापतींकडून कौतूक, खासदार हरभजन सिंगने केला महत्वाच्या मुद्दा उपस्थित
शेतकऱ्यांसाठी हेक्टरी दीड लाखांची मदत जाहीर करा, अजित पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी...
Share your comments