नितीन गडकरी भाजपमधील एक प्रभावशाली नेते असून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीमुळे ते खूप प्रसिद्ध आहेत. परंतु आपल्याला माहित आहेच कि अलीकडेच भाजपच्या मोठ्या संघटनात्मक बदलांमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांना संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीतुन वगळण्यात आले.
त्यानंतर त्यांनी एका कार्यक्रमात हल्लीच्या राजकारणाविषयी आपले मत मांडले होते. तेव्हा ते असे म्हटले होते की सध्याचे जे काही राजकारण आहे त्यामध्ये अस्वस्थ होत असल्याचं ते म्हणाले होते.
नक्की वाचा:१०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता, करोडो रुपये जप्त, सोलापूरमध्ये खळबळ...
या विधानानंतर परत नितीन गडकरी यांनी सरकारवरच निशाणा साधताना शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे तो म्हणजे ते म्हणाले की शेतकऱ्यांनी सरकारच्या भरोशावर राहू नये.
नागपुरात आयोजित ऍग्रो विजन फाऊन्डेशनच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की 'माझं मार्केट मी शोधल असून तुमच मार्केट तुम्ही शोधा' असा सल्ला देखील त्यांनी भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना दिला.
तसेच त्यांनी म्हटले की शेतकऱ्यांनी सरकारवर अवलंबून राहू नये कारण मी स्वतः सरकार मध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय असं देखील ते म्हणाले.
हा सल्ला देतानाच त्यांनी पुढे म्हटले की शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात विकास करायचा असेल तर स्वतः पुढे आले पाहिजे. सरकारच्या भरवशावर न राहता स्वतः कृती करायला पाहिजे.
त्यासोबतच जे काही प्रगतिशील शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचा आदर्श घ्या असा सल्ला देखील त्यांनी शेतकऱ्यांना दिला. अशाच पद्धतीचे वक्तव्य त्यांनी मागील एका कार्यक्रमात देखील केले होते त्यावेळी ते म्हणाले होते की सरकार वेळेवर निर्णय घेत नाही.
नक्की वाचा:शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार 50 हजार रुपये, मोदींचा निर्णय..
Share your comments