1. बातम्या

चारशे वर्ष जुन्या वटवृक्षासाठी नितीन गडकरींनी बदलला महामार्गाचा नकाशा

काही दिवसांपासून सोशल मीडियावर सांगली जिल्ह्यातील भोसे गावात असलेले ४०० वर्ष जुने वटवृक्ष खूप चर्चेत होते. नवीन होणाऱ्या रत्नागिरी- नागपूर महामार्गाचे काम चालू आहे. या महामार्गाचा सर्व्हिस रोड या वटवृक्षा जवळून जाणार होता, यामुळे हे ४०० वर्ष जुने वटवृक्ष तोडावे लागणार होते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

काही दिवसांपासून सोशल मीडियावर सांगली जिल्ह्यातील भोसे गावात असलेले ४०० वर्ष जुने वटवृक्ष खूप चर्चेत होते. नवीन होणाऱ्या रत्नागिरी- नागपूर महामार्गाचे काम चालू आहे. या महामार्गाचा सर्व्हिस रोड या वटवृक्षा जवळून जाणार होता, यामुळे हे ४०० वर्ष जुने वटवृक्ष तोडावे लागणार होते. परंतु पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी या जोरदार विरोध केला.  वाढता विरोध बघता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना याची कल्पना देण्यात आली. 

 

आदित्य ठाकरे यांनी लगेच यावर निर्णय घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आणि त्या वटवृक्षाला न तोडण्याची मागणी केली. आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी महामार्गाचा नकाशा बदलला. महामार्गाचा नकाशा बदलून हा प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नवीन होणारा रत्नागिरी- नागपूर महामार्ग नंबर १६६ हा सांगली जिल्ह्यातील भोसे गावाजवळून जात आहे. सांगलीचे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी हे वृक्ष तोडण्याचा विरोध केला. पर्यावरणवाद्यांचा वाढता विरोध पाहून ही बातमी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे गेली. त्यांनी गडकरींशी चर्चा करुन वटवृक्षाची तोड थांबवली. 

English Summary: Nitin Gadkari changes highway map for 400-year-old banyan tree Published on: 27 July 2020, 03:11 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters