देशातील शेतकरी कोरोना व्हायसरमुळे संकटात सापडला आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी भारतातील सर्वात मोठी उत्पादन पुरवठा करणारी निन्जाकार्ट(ninjacart ) कंपनीने हार्वेस्ट द फार्म’ (‘Harvest The Farms’ ) हा उपक्रम सुरू केला आहे. बाजारपेठांमध्ये भाजीपाला नेण्यासाठी वाहतूक उपलब्ध नसल्याने अनेक शेतकरी आपला शेतमाला शेतातच सडू देत आहेत. यामुळे खर्च करुन पिकावलेला भाजीपाला मातीमोल होत असल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी निन्जाकार्ट पुढे आले असून त्यांच्या मालाला आता ग्राहक मिळवून देत आहे.
शेतकरी आपला शेतमाल निन्जाच्या मध्यस्थीने थेट ग्राहकांकडे पोहचवू शकणार आहेत. स्थानिक पातळीवरील किराणा दुकानदाराच्या मदतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. झोमॅटो, स्विगी आणि डुन्झो यासारख्या अन्न वितरण अॅप्स बंगलोर, मुंबई, दिल्ली-एनसीआर, अहमदाबाद, चेन्नई आणि पुण्यासह काही प्रदेशात या उपक्रमाशी जुडले जाणार आहेत. ग्राहक आपल्या पसंतीनुसार भाजीपाल्यांची ऑर्डर करु शकतील. आपल्या पसंतीनुसार ताज्या भाज्या आणि फळांची ऑर्डर करू शकतील. एप्पमध्ये असलेल्या ताज्या उत्पादन पर्यायात ग्राहक सहजपणे जाऊ शकतात.
उदाहरणार्थ जर एखाद्या ग्राहकांने एप्पमध्ये लॉगिन केले तर ताजे उत्पादन पर्यायात जाईल, म्हणजे स्विगी किराणा, झोमॅटो मार्केट, या पर्यायात जाऊन ग्राहक आपली ऑर्डर देऊ शकता. या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना, निन्जाकार्टचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (ninjacart Co-Founder and CEO) थिरुकुमारन नागराजन म्हणाले, “आपल्या समाजात सकारात्मक प्रभाव येण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यास निंजाकार्टचा नेहमीच विश्वास आहे. हा संकटसमय अनिश्चित काळासाठी आहे, यात पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे. यामुळे आम्ही शेतकऱ्यांना पिकवलेला शेतमाल असाच वाया जाऊ देणार नाही. भारतातील सर्वात मोठी ताजी फ्रेश उत्पादन पुरवठा साखळी असून शहरांमध्ये आमचे जाळे नेटवर्क अधिक आहे. यामुळे आम्हाला विश्वास आहे की, शेतकऱ्यांचा पिकावलेल्या शेतमालाचे कोणतेही नुकसान न होता ते थेट ग्राहकांपर्यंत पोहचवू, असे थिरुकुमारन नागराजन म्हणाले.
Share your comments