शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याचे नऊ कोटी रुपये जमा

11 March 2020 11:52 AM

 

ठाणे : खरीप हंगामात ठाणे जिल्ह्यातील १३ हजार ७९० शेतकऱ्यांनी भातपिकांचा विमा काढलेला आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन दिवसांपूर्वी ९ कोटी १२ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. याविषयीची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अंकृश माने यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे.

अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झाले. पूरस्थितीच्या कालावधीत बहुतांशी शेतकऱ्यांची पिके वाहून गेली होती.  काही ठिकाणी शेतजमीन पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. याशिवाय कर्जमाफीच्या विषयामुळेही येथील शेतकरी चर्चेत होते. अवेळी पाऊस आणि पडणारा रोग यापासून त्यांचे नुकसान होऊ नये, यावरील उपाय योजना म्हणून शेतकऱ्यांवर पीक विमा काढण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यास अनुसरुन जिल्ह्यातील १३ हजार ७९० शेतकऱ्यांनी त्यांच्या ८ हजार ५८० हेक्टर क्षेत्रातील भातपिकाचा विमा काढलेला आहे.

या पीकाचे विविध कारणानी नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परंतु पीक विम्याचा पैसा आल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे. यंदाच्या साडे आठ हेक्टरवरील भात पिकांच्या विम्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना सक्ती करून विमा काढण्यास सांगितले. तर काही शेतकऱ्यांना नुकसानीसंदर्भात मार्गदर्शन व जनजागृती करुन भात पिकाचा विमा काढण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे जिल्हा कृषी अधीक्षकांनी सांगितले.
   

agriculture officer District Superintendent of Agriculture Thane farmer crop insurance कृषी अधीक्षक अधिकारी ठाणे शेतकरी पीक विमा बँक खाते जिल्हा कृषी अधीक्षक
English Summary: nine crores crop insurance credited in farmers bank accounts

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.