सध्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचा ओढा हा सेंद्रिय पद्धतीच्या शेतीकडे वळत आहे. अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीसाठी आग्रही होताना दिसत आहेत. सेंद्रिय शेती म्हटलं म्हणजे शेतकऱ्यांना उत्पन्नाविषयी तडजोड करावी लागते परंतु आरोग्यच्या दुष्टीने सेंद्रिय शेती फायद्याची आहे. दिवसेंदिवस सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पिकांना किंवा शेतमालांला मागणी वाढत आहे. रासायनिक खते आणि औषधांच्या अधिक वापरामुळे भाजीपाला आणि अन्नधान्यातील पोषक घटक कमी होत असतात. यामुळे सध्या नागरिक आरोग्याविषयी जागृक होत रासायनिक औषधे न वापरलेली अन्नपदार्थ घेत आहेत. सेंद्रिय शेती म्हटलं म्हणजे सगळेच नैसर्गिक पद्धतीने होत असते. म्हणजे लागवडीपासून ते पिकांच्या कापणीपर्यंत करण्यात आलेली क्रिया ही नैसर्गिक होत असते. अगदी पिकांची वाढ, पिकांवर येणारे रोगराईही सेंद्रिय औषधाने दूर केली जाते. यात अनेक कीटकनाशके आणि बुरशीनाशके हे सेंद्रिय पद्धतीने बनवली जातात. विशेष म्हणजे हे कीटकनाशके चांगले परिमाणकारक असतात आणि पिकांची गुणवत्तावर कोणताच परिणाम होत नाही. कीटकनाशकातील एक प्रकार म्हणजे निम्बोळी अर्क हे खूप फायदेकारक असते.
निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडाच्या बियांपासून(निंबोळ्या) काढलेला अर्क होय. कडुलिंबाच्या झाडाला फेब्रुवारी ते मार्च महिन्यांत मोहोर येतो आणि मे महिन्याच्या शेवटी निंबोळ्या पक्व होऊन त्यांचा सडा झाडाखाली पडतो. या निंबोळ्या गोळा करून त्यातील दगड-धोंडे आणि खडे वेगळे करून पोत्यामध्ये वर्षभर साठविता येतात.
निंबोळी अर्क बनवण्याची पध्दत
निंबोळी हे कडुनिंबाच्या झाडाच्या फळापासून बनविण्यात येते. कडुनिंब एक मौल्यवान औषधी वनस्पती आहे. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये तसेच शेती क्षेत्रात याचा उपयोग होत आला आहे. कडुनिंब या झाडाची मुळे, खोड, खोडाची साल, डिंक, पान, फुले, फळे, कडूनिंब तेल , निंबोळी अर्क व तेल काढून राहिलेली पेंड अशी प्रत्येक गोष्ट अनमोल आहे. कडुनिंब दीर्घायुषी आहे. आज आपण निंबोळी अर्क कसा बनवावा आणि निंबोळी अर्कचे फायदे बघूया.
१)पावसाच्या सुरुवातीच्या काळात निंबोळी जमा करुन ठेवाव्यात किंवा बाजारातही आपल्याला निंबोळी मिळतात.
२)जमा केलेल्या निंबोळी व्यवस्थित साफ कराव्या त्यानंतर वाळवाव्या आणि साठवून ठेवा.
३)फवारणी करण्याच्या आधीच्या दिवशी आवश्यकता असेल तितकी निंबोळी कुटुन बारीक़ करुन घ्यावा.
४) नंतर तो बारीक़ केलेला चुरा ५ किलो चुऱ्यात ९ लिटर पाणी टाकावे. साधारण ९ लिटर पाण्यात भिजत घालावा. याचबरोबर १ लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबनाचा चुरा वेगळा भिजत घालावा.
५) दुसऱ्या दिवशी सकाळी लाकडी काठीने हे द्रावन दुधासारखे दिसेपर्यंत ढवळावे.
६)द्रावन ढवळून झाल्यावर निंबोळी अर्क स्वच्छ फडक्यातून गाळून घ्यावे. या अर्कात १ लिटर पाण्यात तयार केलेले साबनाचे द्रावन मिसळावे. हा सर्व अर्क १० लिटर होईल एवढे पाणी टाकावे.
निंबोळी अर्क फवारणीचे फायदे :
१)आपण पिकावरील विविध किडीच्या मादीस अंडी घालण्यापासून प्रतिबंधित करता येते.
२) कीटकांवर आंतरप्रवाही किटकनाशकाप्रमाणे निंबोळी अर्क कार्य करते.
३) निंबोळी अर्क विविध प्रकारच्या किडीस खाद्यप्रतिबंधक म्हणून वापरता येते. उदा. पांढरी माशी, घरमाशी, मिलीबग, लष्करी अळी, तुडतुडे, फुलकिडे, उंटअळी इत्यादी.
४) कडुनिंबातील अॅझाडिरॅक्टीन घटक किटकांच्या वाढीस प्रतिबंध करते.
५) निंबोळी अर्क बनवण्यासाठी कमी खर्च येत असल्यामुळे आपला उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते.
हे सर्व फायदे बघता शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काची फवारणी करण्यास काही हरकत नाही. लेखात दिलेल्या या पद्धतीने आपण आपल्या घरीच निंबोळी अर्क तयार करू शकतो.
निंबोळी अर्क बनविण्यासाठी लागणारे साहित्य –
- कडुनिंबाच्या पूर्णपणे सुकलेल्या निंबोण्या – ५ किलो
- चांगले व स्वच्छ पाणी– १०० लिटर
- धुण्याची पावडर -१०० ग्रॅम
- गाळण्यासाठी कापड
लेखक
परशराम हिवरे MSc ( Agri Entomology)
9545756959
यासीन पठाण MSc ( Agri Entomology)
विठ्ठल गडाख Bsc ( Agriculture)
Share your comments