गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. परंतु हा वाढलेल्या थंडीचा कडाका कमी होणार असून पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातील खात्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.तसेचखान्देशचा
उत्तर भाग, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान जालना,परभणी, हिंगोली, जळगाव आणि औरंगाबाद या शहरात 28 ते 29 डिसेंबर या दोन दिवशी पावसाचा येलोॲलर्ट जारी करण्यात आला आहे.
ही स्थिती उत्पन्न होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ईशान्य भारतात वाऱ्याचे चक्र स्थिती तयार झाल्यामुळे त्याचा परिणाम पश्चिमी चक्रावात आवर झाला आहे.
त्यामुळे ईशान्य भारतातील सर्वच राज्यांत बरोबर उत्तर भारतातील पंजाब,हरियाणा, छत्तीसगड,दिल्ली राजस्थान तसे उत्तर प्रदेशाचाकाही भागामध्ये सलग तीन दिवस पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कमी होणार असून पाऊस आणि गारपीट वाढणार आहे.
महाराष्ट्रातील थंडीचा विचार केला तर उत्तर भारताकडून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचे प्रमाण वाढते. परंतु उत्तर भारतात पुढील तीन ते चार दिवस पाऊस आणि गारपीट होणार असल्यामुळे त्याचा थेट परिणाम हा राज्यातील हवामान होणार असून राज्यातील थंडीचा कडाका कमी होऊन पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा अंदाज आहे.
Share your comments