1. बातम्या

पाच दिवस महाराष्ट्र तापणार; विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पुढचे दिवस उष्णतेच्या कडाक्याचे

सध्या सूर्य चांगलीच आग ओकत असून अक्षरशः जीवाची लाही लाही होत आहे. त्यातच येणारे चार ते पाच दिवस राज्यात उष्णतेचा लाटेचा धोका हवामान खात्याने वर्तवला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
heat wave in maharashtra

heat wave in maharashtra

सध्या सूर्य चांगलीच आग ओकत असून अक्षरशः जीवाची लाही लाही होत आहे. त्यातच येणारे चार ते पाच दिवस राज्यात उष्णतेचा लाटेचा धोका हवामान खात्याने वर्तवला आहे.

याबाबत हवामान खात्याने सांगितले की, सूर्याचा युवी इंडेक्स धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यामुळे सूर्याकडून अतिनील किरणांची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे  मार्चमध्ये सलग दुसऱ्यांदा उष्णतेची लाट घोंगावत आहे. जर आपण आधी 17 ते 19 मार्च या कालावधीचा विचार केला तर कोकण आणि विदर्भामध्ये ही लाट आली होती.

नक्की वाचा:गुंतवणुकीसाठी पोस्टाची ही योजना आहे सर्वात्तम; मिळेल महिन्याला पाच हजार रुपयाचे उत्पन्न, वाचा सविस्तर

आता 31 मार्चपर्यंत ही लाट असणार आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणाचा पारा हा 43 अंश याच्यापुढे गेला असून पुढची चार ते पाच दिवस दुपारच्या वेळी अतिनील किरणांची तीव्रता अधिक असल्याने दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे कारण हे अतिनील किरणे आरोग्यासाठी आणि त्वचासाठी खूपच घातक असतात.

 विदर्भ झाला तप्त

 जर सोमवारचा  विचार केला तर राज्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे झाली. चंद्रपूर मध्ये देखील सर्वाधिक  तापमानाची नोंद करण्यात आली असून तापमानाचा पारा 42 अंश याच्यापुढे आहे. वायव्येकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पश्चिम विदर्भामध्ये मागील काही दिवसात सगळ्यात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राजस्थान मधुन जे वारे वाहत आहेत त्यामुळे पश्चिम विदर्भात तापमानात मोठे बदल होत असून अनेक जिल्ह्यात उष्माघाताची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नक्की वाचा:दोन लाख रुपये खर्च करण्याची तयारी असेल तर हा व्यवसाय ठरेल तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट, वाचा आणि करा विचार

29 मार्च म्हणजे आजचा विचार केला तर अमरावती, अकोला आणि बुलढाणा मध्ये उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. त्यासोबतच 31 मार्च खानदेशी साठी उष्ण असणार आहे. 

यामध्ये खानदेशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोलीत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला असून संपूर्ण पश्चिम विदर्भात तापमान सरासरीच्या साडेचार ते साडेसहा अंश सेल्सिअस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 31 मार्च रोजी देखील उष्णता जैसी थे राहुन परिस्थिती कायम राहणार आहे.

English Summary: next five days heat wave in maharashtra especially in vidhrbha meterological department Published on: 29 March 2022, 09:13 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters