1. बातम्या

बातमी कामाची! महावितरणच्या 'या' योजनेमुळे शेतकरी झाला थकबाकीमुक्त, तुम्हीही घ्या लाभ..

सध्या राज्यभरात महावितरणची विजतोडणीची कारवाई सुरु आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना थकबाकीतून मुक्त करण्यासाठी महावितरणकडून योजना राबवली जात आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
scheme MSEDCL

scheme MSEDCL

सध्या राज्यभरात महावितरणची विजतोडणीची कारवाई सुरु आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना थकबाकीतून मुक्त करण्यासाठी महावितरणकडून योजना राबवली जात आहे. (Agricultural Pump) कृषीपंपाची थकबाकी व त्यावरील व्याज यामध्ये सवलत देत 15 हजार 96 कोटी 66 लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. यामुळे अनेक शेतकरी याचा लाभ घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फायदाच होत आहे.

ही योजना फायदेशीर असताना देखील काही शेतकरी या योजनेत सहभागी होत नाहीत. पण नांदेड परिमंडळातील शेतकऱ्यांना याचे महत्व कळाले असून तब्बल 3 हजार शेतकरी हे थकबाकीमुक्त झाले आहेत. या योजनेत 1 लाख 35 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. चालू वीज बिल आणि मार्च 2022 पर्यंतचे सुधारित थकबाकीपैकी 50 टक्केच रक्कमच अदा करावी लागणार आहे. यामुळे काही शेतकऱ्यांना याचे महत्व कळाले आहे.

याबाबत कृषी उर्जा अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून जी थकबाकी वसूल होणार आहे त्याचा उपयोग त्या क्षेत्रात पायाभूत सुविधा करण्यासाठीच होणार आहे. यामध्ये नांदेड परिमंडळात 96 कोटी 64 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला. या वसुलीतुन वीज वितरणासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार असल्याचे महावितरणने सांगितले आहे. यामुळे हे आपल्याच फायद्याचे ठरणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 मार्च ही शेवटची मुदत आहे.

याबाबत माहिती अशी की, थकबाकीदार शेतकऱ्यांनी चालू वीज बिल तसेच मार्च 2022 पर्यंतच्या थकबाकीचा 50 टक्के भरणा केला तर त्यामध्येही 50 टक्के सवलत ही मिळणार आहे. राज्यातील 44 लाख 50 हजार शेतकऱ्यांनी तर या योजनेचा लाभ घेतला तर 15 हजार 353 कोटी 88 लाख रुपये हे माफ होणार आहेत. त्यामुळे या पन्नास टक्के सवलतीचा लाभ शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे. यामुळे ही योजना फायदेशीर आहे. सध्या तोटा होण्यापेक्षा हा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे.

या योजनेच्या माध्यामातून शेतकऱ्यांना तब्बल 30 हजार 450 कोटी रुपयांची माफी मिळणार आहे. यामुळे यावर शेतकऱ्यांनी विचार करणे गरजेचे आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अनेक योजनांमध्ये सर्वाधिक सहभाग राहिलेला आहे. यापूर्वी ‘ई-पीक पाहणी’ या उपक्रमामध्ये सर्वाधिक शेतकरी याच जिल्ह्यातील होते तर पीकविमा योजनेचा लाभही याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला आहे.

English Summary: News work! scheme MSEDCL, farmer has become debt free, you too can benefit .. Published on: 01 March 2022, 11:59 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters