गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आर्थिक संकटात आहे. असे असताना त्याला पुन्हा उभे करावे लागणार आहे. असे असताना आता पुणे जिल्हा बॅंकेच्या वतीने चालू वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामात मिळून २८ फेब्रुवारी २०२२ अखेरपर्यंत पाच लाख रुपयांपर्यंतचे २ हजार १७१ कोटी ६६ लाख ५२ हजार रुपयांचे पीक कर्ज २ लाख ९१ हजार ४३७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आता या शेतकऱ्यांनी कर्जाची मुदतीत परतफेड केल्यास त्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळू शकणार आहे.
असे असताना आता मात्र त्यासाठी आधी व्याजासह सर्व कर्जाची परतफेड करावी लागेल. त्यासाठी अखेरचे केवळ २० उरले आहेत, अशी माहिती बॅंकेच्या सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांचा आर्थिक दुवा म्हणून राज्यातील जिल्हा बँकेकडे बघितले जाते. यामुळे शेतकऱ्यांना नेहेमी फायदा होतो, तसेच गरजेच्यावेळी पैसे देखील मिळतात. आता केंद्राने आता व्याज सवलतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधी त्यांच्याकडील संपूर्ण कर्ज रकमेची व्याजासह परतफेड करणे गरजेचे आहे.
सध्या एक लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी दर साल दर शेकडा ६ टक्के व्याजदराने पीक कर्ज वाटप केले जाते. यापैकी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी तीन टक्के व्याजाचा परतावा शेतकऱ्यांना मिळत असतो. या कर्जाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाखपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने मिळत असते. तसेच यामुळे पैसे वापरायला मिळतात. यामद्ये शेतकऱ्यांना फायदा होतो. अशातच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आता तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे आता पुणे जिल्हा बॅंकेचा दोन टक्के व्याजदराचा परतावा वाचणार आहे. पाच लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्याकडील पीक कर्जाची येत्या ३१ मार्चपर्यंत परतफेड करणे आवश्यक आहे. या मुदतीत पीक कर्जाची परतफेड केली, तरच संबंधित शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराचा फायदा मिळू शकेल. यामुळे याबाबत शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे.
Share your comments