कमी गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात पैसे जमवायची ही एक चांगली संधी आहे. कारण सध्याच्या काळात प्रत्येकालाच अपेक्षा असते की लवकर पैसे कमवायचे त्यामुळे काही लोक व्यवसायात हे शक्यसुध्दा करतात. पण नोकरी करणा-यांसाठी हे इतक शक्य नाही. त्यांच उत्पन्न आणि खर्च निश्चित असल्यामुळे त्यांना पैसे हे ठराविक वेळेतच मिळतात. त्यामुळे अशा एका संधीबद्दल माहिती जाणून घ्या त्यामुळे तुम्हाला मदत होईल.
आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक प्लॅनिंग केला तर तुम्हीही लवकर पैसे कमवू शकता. कारण यात कमी गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात पैसे जमवायची संधी आहे. गुंतवणुकीचे उद्दिष्ट स्पष्टपणे समजून घ्या. एखाद्याने दुस-याकडे पाहून पैशांची बचत करण्यास शिकले पाहिजे. पण कधीही गुंतवणूक करत असताना आपल्या बजेटनुसार करावी. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी सर्व बाबींबद्दल समजून घेणे आवश्यक असते. उदाहरण आपण कुठे गुंतवणूक करत आहोत? आपले वय किती? आणि मिळणारा परतावा मोठा असेल की नाही? व वर्षानपवर्ष आपले उत्पन्न वाढणार असेल तर मग ती रक्कम कुठे गुंतवायची. गुंतवणूक कशी कराल? समजा तुम्हाला महिन्याला 25000 रूपये पगार येतो तर यामधून तुम्ही महिन्याला 2500 रूपयांची बचत करू शकता. जर तुम्हाला असे करणे शक्य झाल तर तुम्ही कमी दिवसात मोठी रक्कम जमवू शकता.
यासाठी तुम्हाला एसआसपी योजनेत गुंतवणूक करावी लागेल. या योजनेतुन तुम्ही कुठल्याही जोखीमशिवाय आपल्या कुटुंबासाठी मोठा निधी जमा करू शकता. तर कसे मिळणार 2 लाख रूपये - 25000 दरमहा पगार असलेली व्यक्ती दर महिन्याला 2500 रूपये एसआयपीमध्ये गुंतवणूक करेल तर त्यांना पाच वर्षानंतर ही रक्कमही 15% परताव्यानुसार सुमारे 2 लाख रूपयांपर्यंत जाते. म्हणजेच 2500 रूपयांनी पाच वर्षाचे 150000 होतात. यात 15% परताव्यानुसार तुमची रक्कम थेट 2 लाखापर्यंत जाते.
गुंतवणूकीचे निश्चित लक्ष्य:
जर नवीन गुंतवणूकदार असेल त्यांना सुरूवातीला आपले उत्पन्न आणि खर्चामधील ताळमेळ बसवणं गरजेच आहे. घरातील एकूण खर्च सोडून एका महिन्याला शिल्लक पैसे किती राहतात. त्यात हिशोबाने आपली गुंतवणूक करावी. तसे आपण एखाद्या महिन्याला जास्त रक्कम गुंतवून दुस-या महिन्याला विचार करण्यापेक्षा आपले लक्ष्य स्पष्ट करून घ्यावे. यासाठी तुम्हाला दरमहा गुंतवणूक सुरूच ठेवावी लागेल.
( टिप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Share your comments