1. बातम्या

आजपासून लागू झाले नवीन नियम ; पेट्रोल – गॅसने धरला भडका

आजपासून देशात अनेक मोठे बदल आणि नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर पडणार आहे. काही नव्या नियमांचा थेट फायदा होणार आहे तर काहींना फटका सहन करावा लागणार आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


आजपासून देशात अनेक मोठे बदल आणि नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर पडणार आहे. काही नव्या नियमांचा थेट फायदा होणार आहे तर काहींना फटका सहन करावा लागणार आहे. यातील काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसानही होऊ शकते. रेल्वे
, गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिजल यांची भाववाड.. तसेच रेशन कार्ड आणि रेल्वेच्या नियमातील बदलांचाही यात समावेश आहे. पाहूत आजपासून बदलणाऱ्या महत्वाच्या गोष्टी…

एक देश एक रेशन कार्ड’ योजनेला सुरूवात –

कोरोना महामारीमध्ये स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर आणि प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. एक जून २०२० पासून २० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेला सुरूवात झाली आहे.  राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दुकानातून लाभार्थ्यांना असलेल्या अन्नधान्य घेता येणार आहे. कोणत्याही राज्यातील रेशन कार्ड असले तरी त्याला अन्नधान्य घेता येणार आहे.

घरगुती गॅसचा भडका–

सामान्यांच्या खिशाला झळ बसणारी बातमी आहे. आजपासून १४ आणि १९ किलोंचा एलपीजी गॅस महागला आहे. १४ किलोचा गॅस सिलेंडर मुंबई आणि दिल्लीत ११ रुपये ५० पैशांनी महागला आहे. १९ किलो किंमतीचा विनाअनुदानित गॅस सिलेंडर राजधानी दिल्लीत ११० रुपयांनी महागला तर मुंबईमध्ये १०९ रुपयांनी महागला आहे.

रॉकेलच्या किंमतीत कपात –

तेल कंपनीने रॉकेलच्या किंमतीत कपात केली आहे. दिल्ली रॉकेल फ्री राज्य म्हणून घोषित केल्यामुळे तेथील किंमती जाहिर होत नाहीत. कोलकातामध्ये आज रॉकेलच्या किंमतीत १२ रुपये १२ पैशांनी कपात झाली. मुंबईत रॉकेल प्रतिलीटर १३ रुपये ८६ पैसे झाले आहे.

आजपासून २०० रेल्वे धावणार–

लॉकडाउनच्या पाचव्या टप्याच्या सुरूवातीलाच २०० नव्या रेल्वे गाड्या धावणार आहेत. यापूर्वी १२ मे पासून राजधानी एक्स्प्रेससारख्या ३० रेल्वे धावत होत्या. आता एक जूनपासून एकूण २३० रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. या सर्व रेल्वे मेल आणि एक्स्परेस आहेत. या रेल्वेंना वेळापत्रकानुसार चालवले जाणार आहे. या सेवेच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी देशभरातून १ लाख ४५ हजार प्रवासी प्रवास करणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

विमान प्रवास महागला –

एविएशन टर्बाइन फ्यूल (ATF) च्या किंमतीत वाढ झाल्यामुळे प्रवास महागला आहे. इंडियन ऑयलच्या संकेतस्थळानुसार, राजधानी दिल्लीत एटीएफचा दर ११०३०.६२ रुपये प्रति किलोलीटरने वाढून ३३,५७५.३७ रुपये प्रति किलोलीटर झाला आहे.

पेट्रोल-डीजलच्या किंमतीत वाढ –

अनेक राज्यात वॅटच्या किंमती वाढवल्यामुळे पेट्रोल आणि डिजेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मिझोराम सरकारने एक जूनपासून राज्यात पेट्रोलवर २.५ टक्के आणि डिझेलवर ५ टक्के वॅट लावला आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रेलच्या किंमतीत वाढ झाली. केंद्रशासित प्रदेश जम्मू-कश्मीर आणि महाराष्ट्र यासारख्या राज्याने पेट्रोल-डिजेलच्या किंमतीत वाढ केली आहे.

सरकारी बस धावणार-

उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांनी परिवहन मंडळाच्या बसेस सोडण्याला मंजूरी दिली आहे. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडे मास्क असणे बंधनकार आहे. बसला वारंवार सॅनेटाइज केले जाईल. त्याशिवाय बसमध्ये बसताना किंवा उतरताना सोशल डिस्टेन्सिंगचा वापर करणे अनिवार्य.

गो एअरसह इतर विमान कंपन्या देशांतर्गत सेवा सुरू करणार-

स्वस्तात सेवा देणारी विमान कंपनी गो एअर देशांतर्गत विमानसेवा सुरू केली आहे. याशिवाय इतर काही विमान कंपनीनेही २५ मे पासून देशांतर्गत वाहतूक सुरू केली आहे.

English Summary: New rules start from today, read here all rules ; petrol and gas cylinder price increased Published on: 01 June 2020, 04:56 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters