1. बातम्या

पुणे परिसरातील शेतकऱ्यांनी शोधला उत्पन्नाचा अनोखा मार्ग

शेती हा कायम तोट्यातील व्यवसाय म्हणून ओळखला जातो. परंतु आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे थोडे लक्ष दिल्यास उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात. ज्या शेतकऱ्यांची शेती ही शहरालगत असेल त्यांच्यासाठी कमाईचा हा मोठा मार्ग या व्यवसायातून मिळणार आहे.

KJ Staff
KJ Staff


शेती हा कायम तोट्यातील व्यवसाय म्हणून ओळखला जातो. परंतु आपल्या  आजूबाजूच्या परिस्थितीकडे थोडे लक्ष  दिल्यास उत्पन्नाचे नवीन मार्ग  मिळू शकतात.  ज्या शेतकऱ्यांची शेती ही शहरालगत असेल त्यांच्यासाठी कमाईचा हा मोठा मार्ग या व्यवसायातून मिळणार आहे.  पुणे परिसरातील शेतकऱ्यांनी असाच उत्पन्नाचा अनोखा मार्ग  शोधला असून त्यामुळे त्यांना निश्चित, असे उत्पन्न मिळू  लागले आहे.

 हा नवा मार्ग आहे फार्म  हाऊसचा. पुणे  शहराजवळील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात फार्म हाऊस बांधले  आहेत.  ते शेतकरी पुण्यातून लगतच्या गावामध्ये  स्वच्छ हवा आणि  शांतता अनुभवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना अशी शेतातील घरं   एक दोन दिवसांसाठी भाडयाने देतात. या पर्यटकांना ग्रामीण राहणीमान, खाद्य संस्कृती, आणि स्वच्छ आणि ताज्या हवेच आकर्षण असते.

 हे पर्यटक एखाद्या शेतकऱ्याकडे राहायला आल्यास, त्या घराचे भाडे, जेवण, नाश्ता याच्या माध्यतातून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. शेती चालू असताना असा उत्पन्नाचा मार्ग मिळाल्यामुळे शेतीवरील भार कमी झाला आहे.   या व्यवसायातून चांगले उत्पन्न  मिळत आहे. या संदर्भात बोलताना अमृतेश्वर  फार्म हाऊसचे मालक आणि शेतकरी उमेश पायगुडे  म्हणतात कि, आमचं गाव पुण्यापासून ३० किलोमीटरवर आहे. आमच्याकडे भाताची शेती केली जाते. त्यानंतर मात्र दुसरं महत्वाच पीक नसते. मी दोन वर्षांपूर्वी शेतात छोटेसे फार्म हाऊस  बांधले. आता आमच्याकडे पुण्यातील कुटुंब  आठवड्याची सुट्टी घालवण्यासाठी येतात. आम्ही त्याचा नाश्ता, जेवण पाहतो. त्यांना प्रामुख्याने गावाकडचे जेवण  हवे असते.  आम्ही त्यांना हवे तसे जेवण तयार करून देतो. एक  ते दोन कुटुंबामागे आम्हाला आठवड्याला साधारण ४ ते ५ हजार रुपये मिळतात. त्यामुळे महिन्याचे २० हजार रुपये होतात. यामुळे आम्हाला आता फक्त शेतीवर अवलंबून रहावे  लागत नाही.”

साधारणपणे मोठ्या मोठ्या शहरांच्या आजूबाजूला असलेल्या  गावात हा उत्पन्नचा चांगला मार्ग  होऊ शकतो.  मुंबई परिसरात कर्जतसारख्या भागात हा शेतीला पूरक असणारा व्यवसाय नवा आकार घेत आहे.  हा व्यवसाय कृषी पर्यटन केंद्रांपेक्षा वेगळा असून त्यात जास्त हुंतवणुकीची आवश्यकता नाही. साधे आणि टुमटुमीत फार्म हाऊस तुम्हाला महिन्याला १५ ते २० हजार रुपये मिळवून देऊ  शकते.  महाराष्ट्र हे भारतातील सर्वात अधिक शहरीकरण झालेल राज्य  आहे. महाराष्ट्रात शहरांचे प्रमाण सार्वधिक आहे. शहरातल्या प्रदूषित वातावरण, धकाधकीच जीवन, ताण  यापासून थोडा वेळ दूर जाऊन शांतता अनुभवणे हे प्रत्येक शहरातील नागरिकांच्या मनात असते. त्यामुळे शहरालगतच्या गावात असा शेतीपूरक  उत्पन्नाचा मार्ग शेतकऱ्यांचे आयुष्य सुकर करू  शकतो

या व्यवसायातील महत्वाचे मुद्दे

१ ) सुरुवातीची गुंतवणूक साधारणपणे ६ ते ८  लाखाची असते.

२ ) शहरी लोकांना आवश्यक सुविधांची निर्मिती करणे आवशयक उदा. टॉयलेट, बाथरूम, पार्किंग.

३ ) हे पर्यटक ग्रामीण खाद्य संस्कृतीला पसंती देतात. त्यामुळे जेवण साधं पण चविष्ट असावं. अशाप्रकारे घरगुती व्यवसायातून छोटा शेतकरी १५ ते २० हजार रुपये मिळवू  शकतात.

या व्यवसायाच्या अधिक माहितीसाठी आपण शेखर पायगुडे यांच्याशी संपर्क करु शकतात.

लेखक-  शेखर पायगुडे

मोबाईल-  9921215008

English Summary: new income source find pune area's farmer - Published on: 22 July 2020, 10:00 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters