Pune News : राज्यात नव्याने पालकमंत्री पदाचा विस्तार झाला आहे. नव्याने १२ पालकमंत्र्यांची जिल्ह्यांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारमध्ये अजित पवार गटाचा सहभाग झाल्यानंतर या पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात संघर्ष असल्याचं पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी बुधवारी जाहीर केली.
सुधारीत यादीनुसार पुण्याचे नवे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहेत. पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका होत आहेत. त्यामुळे पालिका राखली जावी यासाठी अजित पवार यांचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. पुणे विधानसभेच्या निवडणुकीतही पक्षाला चांगलं यश यावं म्हणून अजित पवार यांनी पुण्याचं पालकमंत्रीपद आपल्याला देण्याची मागणी केली होती.
सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :
पुणे - अजित पवार
अकोला - राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर - चंद्रकांत दादा पाटील
अमरावती - चंद्रकांत दादा पाटील
वर्धा - सुधीर मुनगंटीवार
भंडारा - विजयकुमार गावित
बुलढाणा - दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर - हसन मुश्रीफ
गोंदिया - धर्मरावबाबा आत्राम
बीड - धनंजय मुंडे
परभणी - संजय बनसोडे
नंदूरबार - अनिल भा. पाटील
Share your comments