सध्या शेतकरी आर्थिक संकटांना सामोरे जात असताना आता अजून एक मोठे संकट त्याच्यापुढे आले आहे. आता पिवळ्या विषारी 'घाेणस अळी'ने पूर्व विदर्भानंतर आता पश्चिम विदर्भात शिरकाव केला आहे, वाशिम जिल्ह्यातील माळशेलू येथील महिला रविवारी शेतात काम करीत असताना या अळीने तिला डंख मारला, यामुळे त्या महिलेला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
यामुळे आता शेतकरी चिंतेत आहेत, आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मकाच्या पिकांवर घोणस अळीचे संकट उभे राहिले आहे. त्यातच घोणस अळी शेतकऱ्यांना चावा घेत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे यावर लवकरात लवकर उपाय शोधण्याची गरज आहे.
घोणस अळी थेट शेतकऱ्यांना चावा घेत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आतापर्यंत तीन शेतकरी यामुळे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात आल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. घोणस अळीमुळे भीतीचे वातावरण असतानाच फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार, रांजणगाव आणि गिरसावळी येथील शेतकऱ्यांना या अळीने चावा घेतला आहे.
चावा घेतलेल्या तीनही शेतकऱ्यांवर फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. उपचार योग्य वेळेत झाल्याने त्यांची प्रकृती आता चांगली आहे. पण या घटनेमुळे फुलंब्री तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विदर्भातील काही भागांत सोयाबीनवर घोणस नावाच्या बहुभक्ष्यी विषारी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
मोबाईलने जमीन किंवा शेत कसे मोजायचे? वाचा साधी आणि सोप्पी पद्धत..
बांधावरील गवत, एरंडी, आंबा झाडे व फळपिकावर ती आढळून येत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ही अळी वाशिम जिल्ह्यातील साेयाबीन पिकावर माेठ्या प्रमाणावर आढळून आली आहे. या अळीच्या अंगावरील बारीक काट्यांत विषग्रंथी असून, तो काटा माणसाच्या त्वचेत टोचून अळी विषारी रसायन शरीरात सोडते. त्यामुळे त्वचेवर परिणाम होऊ लागतो. तसेच बेशुद्धही पडू शकताे.
महत्वाच्या बातम्या;
भारतीय डेअरी उद्योग आज जागतिक झाला आहे, सेबॅस्टियन बिमिता यांनी केले देशाचे कौतुक
भीमाशंकर साखर कारखान्यास देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर
Farmar loan: कर्ज फेडणाऱ्या ४९ हजार शेतकऱ्यांना लाभ, शेतकऱ्यांना दिलासा
Share your comments