गेल्या काही वर्षांमध्ये डाळींबाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनेक संकटे येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर बागा काढून टाकण्याची वेळ आली आहे. तेल्या रोगाचा सामना शेतकरी करत असताना आता 'पिन होल बोरर' किडीचे संकट या पिकावर आले आहे. राज्यात सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डाळींबाची शेती केली जाते. असे असताना याठिकाणी आता शेतकरी बागा काढून टाकत आहेत. पिन होल बोरर या किडीच्या प्रादुर्भावातून डाळिंबाने लखडलेली झाडे पिवळी पडून नंतर वाळून जात आहेत.
ज्या शेतकऱ्यांच्या बागांमध्ये या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे अशा बागेतील डाळींबाची काही झाडे वाळून गेली आहेत तर काही झाडे पिवळी पडू लागली आहेत. यामुळे काही दिवसातच ही झाडे पूर्णपणे जळून जात आहेत. यामुळे या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. आधीच मर रोग आणि तेल्या रोगामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे, यामुळे अनेकांनी आपल्या काढून टाकल्या आहेत. यामुळे याचे क्षेत्र घटले आहे. सरासरीपेक्षा फारच कमी क्षेत्रात याची लागवड राहिली आहे, त्या तुलनेत गुजरात आणि राजस्थानमध्ये याचे क्षेत्र वाढले आहे.
येथील शेतकरी धोंडीराम भोसले यांनी सांगितले की, गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्या दीड-दोन एकरातील 680 झाडावर पिन होल बोरर या किडीचा प्रादुर्भाव झला आहे. त्यामुळे भोसले यांचे मोठे नुकसान झाले आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे आता भोसले यांना शेतातील सर्व झाडे काढून टाकावी लागणार आहेत. अनेक शेतकऱ्यांची सध्या अशीच अवस्था झाली आहे. पिन होल बोरर ही कीड झाडाच्या खोडाला लागते. त्यामुळे झाडाला ठिकठिकाणी छिद्रे पडतात आणि त्यातून भुसा बाहेर पडतो. त्यामुळे हिरवे पाने पिवळी पडू लागतात आणि झाडे वाळायला सुरुवात होते.
यामुळे डाळिंब देखील झाडावरच जळून जात आहे. यावर अजून कोणतेही प्रभावी असे औषध आले नाही, यामुळे झाडे तोडण्याशिवाय कोणताही पर्यात शेतकऱ्यांपुढे उरला नसल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत 4 ते 5 हजार हेक्टर बागा या किडीच्या प्रादुर्भावाखाली आहेत. यामुळे ५० टक्के झाडे या रोगाचा सामना करत असल्याचे येणाऱ्या काळात यावर काही उपाय निघाला नाही, तर अनेक बागा नष्ट होणार आहेत. यामुळे आता यावर औषध उपलब्ध होणे गरजेचे झाले आहे.
Share your comments