MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

मुहूर्ताच्या सोयाबीनला मध्यप्रदेश मधील बाजारपेठेत मिळाला 16 हजार 151 रुपयाचा भाव

मध्यप्रदेश मधील रतलाम जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. लिलावाच्या पहिल्याच दिवशी शेतकर्यांममध्ये फार आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. एका क्विंटल सोयाबीन ला मिळालेला भावाची शेतकऱ्यांनी अपेक्षा सुद्धा कधी केली नसेल.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
soyabion

soyabion

 मध्यप्रदेश मधील रतलाम जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. लिलावाच्या पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांमध्ये फार आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. एका क्विंटल सोयाबीन ला मिळालेला भावाची शेतकऱ्यांनी अपेक्षा सुद्धा कधी केली नसेल.

 रतलाम जिल्ह्यातील सैलाना कृषी बाजार समितीमध्ये पहिल्या दिवशी सोयाबीनची आवक होऊन पहिल्या दिवशी मुहूर्ताला सोयाबीनला चक्क सोळा हजार एकशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. सांगितले जात आहे की पहिल्यांदाच सोयाबीनला प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला. नांदलेटाया गावातील शेतकरी गोवर्धन यांनी तीन क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणले होते.

या तीन क्विंटल सोयाबीन च्या माध्यमातून त्यांना चक्क 52 हजार  705 रुपयांचं उत्पन्न मिळाले. याबाबतचे वृत्त टीव्ही नाईन भारतवर्ष यांनी दिले आहे.यावेळी सैलाना बाजार समितीचे सचिव किशोर कुमार नरगावे यांनी सांगितले की सोयाबीनची नवीन आवक झाल्यानंतर शेतकऱ्यांनी अन्नधान्याचे पूजा-अर्चना केली त्यानंतर त्याची विक्री सुरू केली.

बाजारांमध्ये जवळजवळ पंचात्तर क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. जे 7 हजार ते 16 हजार रुपये प्रतिक्विंटल भावाने विकले गेले.

 तसे पाहायला गेले तर सोयाबीनचे किमान आधारभूत किंमत ही 2021 आणि 22 साठी केंद्र सरकारने तीन हजार 950 रुपये प्रतिक्विंटल ठरवले आहे. या एम एस पी पेक्षा काही पटीने जास्त भाव सोयाबीनला मिळाला आहे.

English Summary: new coming soyabioen receive rate highest in mp market Published on: 19 September 2021, 10:13 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters