सध्या हळू हळू सेंद्रिय शेतीचे महत्व वाढत चालले आहे. शेतातील वाढता रासायनिक खतांचा वापर यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येत असल्याने लोकांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढू लागला आहे. वाढत्या रासायनिक खतांच्या वापरामुळे लोकांना कॅन्सर सारख्या आजारांची आणि वेगवेगळ्या रोगांची लागण होत आहे.
निंबोळी खताचा वापर शेणामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो:
सेंद्रिय शेती करण्यासाठी त्यात खत म्हणून नैसर्गिक वस्तूंचा वापर केला जातो. यामध्ये पालापाचोळा, शेण, वैरण, गांडूळखत आणि लिंबोळ्या पासून बनवलेले आणि कुजवलेले खतयांचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडापासून मोठ्या प्रमाणात खत निर्मिती केली जाते. त्यास आपण ऑरगॅनिक खत असे सुद्धा म्हणतो. लिंबाचा पाळा आणि त्याच्या लिंबोळ्या या पासून निंबोळी पेंड तयार केली जाते. बाजारात याला मोठी मागणी सुद्धा आहे.निंबोळी खताचा वापर शेणामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. ऑरगॅनिक स्वरूपाचे खत असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी या खताला आहे तसेच सेंद्रिय शेती साठी अत्यंत आवश्यक अशी ही निंबोळी पेंड आहे. निंबोळी पेंड ही फळबागायतदार कांदा उत्पादक शेतकरी आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी वर्गाला खूप आवश्यक आहे.
निंबोळी पेंडीचे फायदे:-
1)शेतात निंबोळी पेंड घातल्यामुळे रानातील जमिनीतील वाळवी,हुमणी आणि ढेकूण या सारख्या किड्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण होते.
2)वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी पासून पिकांचे संरक्षण होते. आणि पिके रोगराई ला बळी पडत नाहीत.
3)शेतात निंबोळी पेंड घातल्यामुळे पिक वाढीस फायदा होतो त्याचबरोबर पिकाला अनेक वर्षे पर्यंत अन्नपुरवठा करत राहतात त्यामुळे इतर खतापेक्षा निंबोळी पेंड फायदेशीर ठरते.
4)उपयुक्त असणाऱ्या जमिनीतील सूक्ष्म जिवाच्या वाढीसाठी उपयुक्त असते. त्यामुळे शेतात निंबोळी पेंड घालावी
5)शेतात सेंद्रिय कार्बन चे प्रमाण वाढण्यास मदत होते.
6)शेतातील उत्पन्न वाढण्यास मदत होते. आणि शेतातील मातीची सुपीकता वाढते.
7)निंबोळी खताच्या वापरामुळे पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते.
Share your comments