
Sadanand Gowda
सन 2015-16 मध्ये सुरू झालेल्या निंबाच्या लेपयुक्त युरियामुळे रसायनांचा वापर कमी करण्यास आणि पीकांचे उत्पादन वाढण्यास मदत झाली असल्याचे रसायन व खत मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी रविवारी सांगितले. तसेच शेती नसलेल्या कारणांसाठी युरियाचे विचलन कमी करण्यात मदत केली आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
रसायनांचा वापर कमी:
2015-16 मध्ये सुरु झालेल्या 100 टक्के कडुलिंबयुक्त युरियामुळे रसायनांचा वापर कमी करणे, मातीचे आरोग्य सुधारणे, कीड व रोगाचा धोका कमी करणे आणि उत्पादन वाढणे यामध्ये मदत झाली आहे, असे मंत्री यांनी ट्विट केले.यूरिया हे देशातील शेतकरी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात वापरतात. हे अत्यंत अनुदानित खत आहे, आणि ज्याची किरकोळ किंमत सरकारने निश्चित केली आहे.
हेही वाचा:कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत व इस्त्राईल यांच्यात ३ वर्षासाठी कृषी करार
कडुलिंबयुक्त लेपित यूरिया ही गहू व धानाच्या वाढीस चालना देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली एक खत व कृषी योजना आहे आणि युरियाच्या जमाखोरीस आळा घालण्यासाठी वापरात आणले होते. कडुलिंबाच्या झाडाच्या तेलाने लेप केलेल्या युरियाला कडुलिंब-लेपित युरिया म्हणतात. जानेवारी 2015 मध्ये, यूरिया उत्पादकांना निंबाच्या लेपित युरियाच्या अनुदानित रकमेचे उत्पादन 35 टक्क्यांवरून 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे सरकारने आदेश दिले होते .
सध्या युरियाची कमाल किरकोळ किंमत प्रति टन 5,360 रुपये आहे. 2010 पासून हा दर बदललेला नाही.रासायनिक खतांमुळे होणा-या हानींपैकी काहींमध्ये जलमार्ग प्रदूषण, पिकांना रासायनिक ज्वलन, वायू प्रदूषण वाढणे, मातीचे आम्लीकरण आणि मातीतील खनिज कमी होणे यांचा समावेश आहे.याला आळा घालण्यासाठी सरकारचे हे मोठे पाऊल आहे.
Share your comments