1. बातम्या

ज्वारी पिकात कमी पाण्यात येणारा वाण हवा

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्रास दिनांक 17 व 18 जानेवारी रोजी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पंचवार्षिक पुनरावलोकन समितीने (कुआरटी) भेट दिली. नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदे वतीने या समितीच्‍या माध्‍यमातुन दर पाच वर्षाने कृषी संशोधन केंद्राचा आढावा घेतला जातो. सदरिल समितीचे अध्यक्ष हिसार येथील चौधरी चरण सिंह कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. एस. खोकर हे होते तर सदस्य म्‍हणुन हैद्राबाद येथील आयआयएमआरचे माजी संचालक डॉ. जे. व्हि. पाटील, माजी प्रकल्प समन्वयक (बाजरा) डॉ. ओ. व्हि. गोविला, बेंगलोर येथील माजी प्रकल्प समन्वयक डॉ. चन्नाबायरे गोवडा, आयआयएमआर, हैद्राबाद येथील मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. एच. एस. तलवार आदींचा समावेश होता.

KJ Staff
KJ Staff


परभणी:
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्रास दिनांक 17 व 18 जानेवारी रोजी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पंचवार्षिक पुनरावलोकन समितीने (कुआरटी) भेट दिली. नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदे वतीने या समितीच्‍या माध्‍यमातुन दर पाच वर्षाने कृषी संशोधन केंद्राचा आढावा घेतला जातो. सदरिल समितीचे अध्यक्ष हिसार येथील चौधरी चरण सिंह कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. एस. खोकर हे होते तर सदस्य म्‍हणुन हैद्राबाद येथील आयआयएमआरचे माजी संचालक डॉ. जे. व्हि. पाटील, माजी प्रकल्प समन्वयक (बाजरा) डॉ. ओ. व्हि. गोविला, बेंगलोर येथील माजी प्रकल्प समन्वयक डॉ. चन्नाबायरे गोवडा, आयआयएमआर, हैद्राबाद येथील मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. एच. एस. तलवार आदींचा समावेश होता.

ज्वार संशोधन केंद्रावरिल प्रक्षेत्रास व प्रदर्शनास भेट देऊन रब्बी ज्वारीच्या विविध संशोधनात्‍मक प्रयोग व नविन संशोधित वाणांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्‍या अध्यक्षतेखाली सदरिल समिती सदस्‍यासोबत दि. 18 जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. पी. म्हेञे, ज्वार पैदासकार डॉ. एल. एन. जावळे आदीसह विविध विभागांचे शास्त्रज्ञ, तसेच मौजे मानोली (ता. मानवत जि. परभणी) व मौजे वाई (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील ज्‍वार उत्‍पादक शेतकरी उपस्थित होते. बैठकीत बोलतांना मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, खरीप व रब्बी ज्वारी हे बदलत्या वातावरणामध्येही तग धरणारे पिक असुन यापासुन मनुष्‍यासाठी पोषक अन्‍न तर जनावरासाठी चांगल्या प्रतिचा कडबा मिळतो. 

आज ज्वारीपासुन मुल्यवर्धीत पदार्थ जसे रवा, शेवया, पोहे, बिस्कीट, लाहया आदींना मागणी वाढत आहे, त्यामुळे पुन्‍हा ज्‍वारीस आर्थिक महत्‍व प्राप्‍त होईल, असे मत व्‍यक्‍त केले. यावेळी मा. डॉ. के. एस. खोकर यांनी उपस्थित ज्‍वार उत्‍पादक शेतकऱ्यांना नवीन ज्वारीचे वाण व संशोधनाबाबत अपेक्षा विचारल्‍या असता प्रगतशील शेतकरी मदन महाराज शिंदे यांनी कमी पाण्‍यात लवकर येणारा व प्रथिनांचे प्रमाण जास्त असणारा वाण विकसीत करण्‍याची गरज असल्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त केली. मौजे वाई येथील शेतकरी नामदेव संभाजी लाखाडे यांनी ज्वार संशोधन केंद्राकडुन आदिवासी उपयोजने अंतर्गत वाई येथे राबविण्‍यात आलेल्‍या विविध वाणांच्या प्रात्यक्षिकांना आदिवासी शेतकऱ्यांना लाभ झाल्‍याचे सांगितले.

English Summary: Need of Minimum Water Requirement Sorghum Variety Published on: 21 January 2019, 08:23 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters