सध्या राजकारणात काय होईल सांगता येत नाही. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात असताना आता गुजरात मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार कंधाल जडेजा (Kandhal Jadeja) यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीची (Gujrat Election 2022) उमेदवारी नाकारल्याने जडेजा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता राष्ट्रवादी किती ताकदीने लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जडेजा यांनी सपाकडून कुटियाना या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते राष्ट्रवादीकडून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. आता ही जागा काँग्रेसकडे गेली आहे. यामुळे ते नाराज झाले होते.
भवानीनगरमध्ये शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी, तज्ञांकडून मार्गदर्शन..
काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी उमरेठ, नरोदा आणि देवगड बारिया या 3 जागांवर निवडणूक लढवणार आहे. सध्या सगळे पक्ष प्रचारात गुंतले आहेत. आता कोण बाजी मारणार हे लवकरच समजेल.
शेतकऱ्यांना शेती कर्जासाठी सीबीलची अट नको, शेती करणे झाले अवघड
दरम्यान, गुजरातमध्ये भाजप, काँग्रेस, आणि आम आदमी पार्टीमध्ये जोरदार चुरस बघायला मिळत आहे. सध्या आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपकडून देखील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या;
पॉलिहाऊस, शेडनेटच्या नादी लागले आणि आज घरदार विकायची वेळ आली, अनेकांच्या आत्महत्या
'शेती फायदेशीर करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न सुरु'
महाराष्ट्रात टाटा पॉवर उभारणार 150 मेगा मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प...
Share your comments