यावर्षीचा नवरात्री उत्सव 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहे. नवरात्र उत्सव म्हणजे आदि शक्तीचा जागर करण्याचे नऊ दिवस. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्र उत्सवात अनेकांच्या घरी घटस्थापना केली जाते. तर यंदा घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय आहे ? आणि घटस्थापना कशी करावी? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
नवरात्री कलश स्थापना मुहूर्त -
नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला, कलशाची विधीपूर्वक स्थापना केली जाते तसेच 9 दिवस उपवास आणि पूजा करण्याचा संकल्प केला जातो. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर 2023 रोजी अभिजीत मुहूर्त सकाळी 11:44 ते दुपारी 12:30 पर्यंत असेल. काळात घटस्थापना करू शकता.
घटस्थापनेचा विधी -
ईशान्य दिशा हे पूजेसाठी सर्वोत्तम स्थान मानले जाते. सर्वप्रथम घटस्थापना करण्यापूर्वी चौरंगावर लाल कपडा बांधावा. एका मातीच्या भांड्यात थोडी स्वच्छ माती टाका आणि त्यात थोडे पाणी शिंपडुन गव्हाचे दाणे टाकावेत.यानंतर कलशाला मौली धागा बांधून त्यावर चंदनाने किंवा कुंकूने स्वस्तिक काढावे.घटात म्हणजेच कलशात थोडे पाणी टाकुन त्यात गंगाजल मिसळा. त्यानंतर घटात सुपारी, दुर्वा, अक्षत आणि 1 नाणे पाण्यात टाकावे, सोबतच आंब्याची पाच पानं ठेवा. यानंतर,कलशावर नारळ ठेवा नारळाचे मुख खालच्या दिशेला असता कामा नये. कलशाच्या तळाशी थोडे तांदूळ ठेवावेत. यानंतर ज्यामध्ये गहू पेरले आहेत त्यावर कलश स्थापित करुन सर्व देवी-देवतांचे ध्यान करून पूजा सुरू करा.
Share your comments