नैसर्गिक शेतीक्षेत्रात वाढ होण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून केंद्र सरकार कोणत्या न कोणत्या योजना काढत आहे. एवढेच नाही तर नैसर्गिक कृषिक्षेत्र वाढवण्याची जबाबदारी आता कृषी विद्यापीठांवर टाकलेली आहे. वाणिज्य मंत्रालयाने नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून उत्पादित मालाची निर्यात करून बाजारपेठ मिळवून देऊ असे सुद्धा सांगितले आहे. जे की कृषी विभाग व निर्यात विभागामध्ये चर्चा चालू असून सेंद्रीय शेतीचे महत्व वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रिय शेतीतील खाद्यपदार्थ तसेच सौंदर्यप्रसाधने व औषधांची जास्त मागणी आहे.
असा होणार नैसर्गिक शेतीचा फायदा :-
सेंद्रिय शेतीमधून निघणाऱ्या मालाला जर निर्यातीची मान्यता मिळाली तर याच थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. निघालेल्या मालाला चांगला दर तर मिळणार आहेच तसेच त्या वस्तूचे मूल्य जागतिक पातळीवर सुद्धा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना परकीय चलन तर भेटणार आहेच. अपेडाने राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम अंतर्गत सेंद्रिय उत्पादन निर्यातीचा लाभ घेण्यासाठी तसेच उत्पादक, निर्यातदार, विविध राज्य सरकारी अधिकारी व इतर वर्गाच्या गरजा भागवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.
गंगा नदीकाठचा परिसरात सेंद्रीय शेती :-
मागील अनेक दिवसांपासून सेंद्रिय शेतीक्षेत्र वाढावे म्हणून जनजागृती केली जात आहे. काळाच्या ओघात सेंद्रिय शेतीकडे ओळणे का महत्वाचे आहे तर केंद्र सरकार सारखे सांगत आहे. अगदी याच अनुषंगाने देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन सांगतात की पहिल्या टप्प्यामध्ये गंगा नदीच्या काठावर जर पाच किमी रुंद परिसर आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर लक्ष असून देशात केमिकल्सयुक्त शेतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. देशात गुजरात, हिमाचल प्रदेश तसेच आंध्रप्रदेश या राज्यात सुद्धा रसायनमुक्त म्हणजेच सेंद्रिय शेती केली जात आहे.
नैसर्गिक शेती म्हणजे रसायनमुक्त शेती :-
नैसर्गिक शेतीमध्ये आपण गाई किंवा म्हशीचे शेणखत, मूत्र तसेच गांडूळ कंपोस्ट अशा अनेक नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. जे की युरिया, डायमोनियम फॉस्फेट व इतर कृत्रिम खते आणि कीटकनाशके याना वापर आजिबात केला जात नाही. ईशान्येकडील प्रदेश आणि डोंगराळ राज्य सुद्धा नैसर्गिक शेतीकडे आपला कल ओळवत आहे. रासायनिक खताचा वापर न करता नैसर्गिक खताचा वापर करून तेथील लोक पिकांची लागवड करत आहेत.
Share your comments