खरीप हंगामाचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले त्यामुळे हे नुकसान रब्बी हंगामात भरून काढायचे असा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बी हंगामातील पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे. रब्बी हंगामात जो हरभरा पेरला होता त्या हरभऱ्याला निसर्गाचा फटका बसलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील येनंदापेंदा परिसरात शिवाजी बोईनवाड या शेतकऱ्याने आपल्या शेतात हरभरा लागवड केली होती. मात्र या निसर्गाच्या अनियमितपणामुळे हरभरा पिकाला फळधारणा च झाली नसल्याने शिवाजी बोईनवाड या शेतकऱ्याने पूर्ण हरभऱ्याच्या पिकावर कुळव चालवले आहे. या टोकाच्या निर्णयामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे जे की अगदी सोशल मीडियावर सुद्धा त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झालेला आहे.
हरभरा पिकाचे विक्रमी क्षेत्र :-
शेतातील उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पारंपरिक पीक न घेता हरभरा चे पीक घेतले. हंगामाच्या सुरुवातीला सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते तसेच कृषी विभागाकडून सुद्धा याबाबत जनजागृती करण्यात आली होती. मराठवाडा मध्ये यंदा पहिल्यांदाच हरभरा पिकाचे क्षेत्र वाढले होते. हरभरा च्या पिकाला पहिली पसंद तर गहू पिकाला दुसरी पसंद आणि ज्वारी पीक तिसऱ्या क्रमांकावर गेले होते. लागवड केल्यापासून शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेतली मात्र खरीपाप्रमाणेच रब्बी हंगामाचे सुद्धा नुकसान झाले.
अवकाळी, गारपीट अन् आता ढगाळ वातावरण :-
निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामाचा सामना करावा लागत आहे. पेरणी करताच अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले. तर आता कुठे पीक बहरत होते तोपर्यंत गारपीठ सुरू झाली आणि फळधारणा दरम्यान वातावरणात झालेल्या बदलाने फळधारणा सुद्धा राहिली गेली. हे तिन्ही संकटे कमी तो पर्यंत मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला.
म्हणे, एकाच पीक पध्दतीमुळे शेतकऱ्याचे नुकसान :-
रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा झाल्यापासून आतापर्यंत अवकाळी, गारपिट आणि ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागला त्यामुळे हरभरा पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव झाला. हरभऱ्याला घाटे लागण्याच्या अवस्थेत च निसर्गामुळे नुकसान झाले. दरवर्षी पिकाचा पेरा केल्यामुळे हरभऱ्याला फळधारणा झाली नाही असे कृषी विभागाने सांगितले आहे तर बांधावर एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
Share your comments