1. बातम्या

विविध परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा राष्ट्रीय चाचणी संस्थेने पुढे ढकलल्या

नवी दिल्ली: कोविड-19 च्या उद्रेकामुळे विविध परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना होणारा त्रास लक्षात घेता, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी राष्ट्रीय चाचणी संस्थेला विविध परीक्षांसाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा बदलण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे त्यानुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेने या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या असून नवे वेळापत्रक जारी केले आहे.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
कोविड-19 च्या उद्रेकामुळे विविध परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना होणारा त्रास लक्षात घेता, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी राष्ट्रीय चाचणी संस्थेला विविध परीक्षांसाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा बदलण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे त्यानुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेने या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या असून नवे वेळापत्रक जारी केले आहे.

सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे:

अनुक्रमांक

परीक्षा

सध्याच्या तारखा

सुधारित तारखा *

From

To

From

To

01

नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट (NCHM) JEE-2020

01.01.2020

30.04.2020

01.03.2020

15.05.2020

02

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ IGNOU) पीएचडी आणि OPENMAT(MBA) साठीची प्रवेश परीक्षा

28.02.2020

30.04.2020

01.03.2020

15.05.2020

03

इंडियन  कौन्सिल ऑफ  एग्रीकल्चर रिसर्च(ICAR)-2020

01.03.2020

30.04.2020

01.03.2020

15.05.2020

04

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रवेश परीक्षा  (JNUEE)-2020

02.03.2020

30.04.2020

02.03.2020

15.05.2020

05

इंडीया आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (AIAPGET)-2020

01.05.2020

31.05.2020

06.05.2020

05.06.2020


ऑनलाइन फॉर्म संध्याकाळी चार वाजेपर्यंत भरता येतील आणि शुल्क रात्री 11.50 पर्यंत स्वीकारले जाईल. हे शुल्क क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/UPI आणि पेटीएम ने भरता येईल. या परीक्षांचे बदललेले वेळापत्रक संबंधित अभ्यासक्रमांच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध केले जाणार असून तिथूनच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देखील डाऊनलोड करता येईल.

विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षांची काळजी करु नयेअसे आववाहन NTA ने केले असून सध्याचा वेळ परीक्षांची तयारी करण्यात घालवावाअसा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे. परीक्षांच्या वेळापत्रकात होणाऱ्या बदलाविषयी NTA वेळोवेळी विद्यार्थ्यांना सूचित करत राहील. परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांनी www.nta.ac.in या वेबसाईट वेळोवेळी बघत राहाव्यात असे आवाहन देखील NTA ने केले आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवार  8287471852, 8178359845, 9650173668, 9599676953, 8882356803 या क्रमांकावर देखील संपर्क साधू शकतात.

English Summary: National Testing Agency has postponed the dates for filling up online applications for various exams Published on: 01 May 2020, 07:40 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters