राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा 12 मे ऐवजी 16 जूनला होणार

Friday, 29 March 2019 08:01 AM


मुंबई:
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. 10 वी राज्यस्तर परीक्षेत निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर परीक्षा लोकसभा निवडणूक कामकाजामुळे रविवार दिनांक 12 मेऐवजी रविवार दि. 16 जून 2019 रोजी होणार आहे. संबंधित निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे एप्रिल 2019 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात एनसीईआरटी (NCERT) नवी दिल्ली यांच्या www.ncert.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा इ. 10 वी साठी राज्यस्तर परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत 04 नोव्हेंबर 2018 रोजी घेण्यात आली होती. एनटीएस इ. 10 वी परीक्षेसाठी राज्यातून 86 हजार 281 विद्यार्थी नोंदवण्यात आले होते. एनसीईआरटी नवी दिल्लीकडून राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातून 387 विद्यार्थी कोटा ठरवण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या 387 विद्यार्थ्यांची निवड यादी 1 मार्च रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती.

तथापि एनसीईआरटी नवी दिल्ली यांचेकडून महाराष्ट्रासाठी सन 2018-19 व सन 2019-20 साठी सुधारित कोटा 774 विद्यार्थी इतका देण्यात आलेला आहे. त्यामध्ये सर्वसाधारण गटातील(General) 391, इतर मागास वर्गीय संवर्गातील 209, अनुसूचित जाती (SC) 116 व अनुसूचित जमाती (ST) 58 अशा एकूण 774 विद्यार्थ्यांचा कोटा देण्यात आलेला आहे. संबंधित संवर्गातील समान गुणांचे विद्यार्थी समाविष्ट करून 775 विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच संबंधित संवर्गात अपंगांसाठीचे 4% आरक्षण समाविष्ट आहे.

सुधारित निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in  http://nts.mscescholarshipexam.in या वेबसाईटवर 19 मार्च रोजी सायं. 5.00 वाजता जाहीर करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड जात/अपंगत्व आरक्षणातून झालेली आहे, त्यांनी सदर प्रमाणपत्राची सत्य प्रत प्रवेशपत्रासोबत एनसीईआरटी नवी दिल्ली यांना सादर केल्याशिवाय त्यांची निवड कायम समजण्यात येणार नाही.

NTS Exam NCERT राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा एनसीईआरटी National Talent Search Examination
English Summary: National Talent Search Examination will take place on June 16 instead of May 12

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.