सन 2020 मध्ये कोरोना काळात देशात आत्महत्येच्या प्रमाणात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने आपल्या अहवालात म्हटले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या च्या मते 1967 नंतर 2020 या वर्षात सर्वाधिक आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
जर भारताचा विचार केला तर जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020या कालखंडात एकूण एक लाख 53 हजार 52 आत्महत्यांची नोंद झाली.जर यायानुसार विचार केला तर दर दिवशी देशात सरासरी चारशे 19 जणांनी आपले आयुष्य संपवले.जर 2019 चा विचार केला तर त्या तुलनेमध्ये हे प्रमाण दहा टक्क्यांनी अधिक आहे.
राज्यनिहाय विचार केला तर बिहारमध्ये सर्वात कमी म्हणजे 0.7टक्के आत्महत्यांची नोंद झाली. त्यानंतर मनिपुर 1.4 टक्के, उत्तर प्रदेश 2.1 टक्के, नागालँड 2.2 टक्के आत्महत्यांची नोंद झाली.
राजस्थान मध्ये 7.2टक्के, मध्यप्रदेशात 17.40 टक्के आणि महाराष्ट्रात 16.1 टक्के आत्महत्यांची नोंद झाली आहे. कोरोना मुळे लावण्यात आलेल्या लोक डाऊन मुळे दीर्घकाळासाठी बरेच उद्योगधंदे बंद होते.त्याचा सरळ सरळ परिणाम रोजगारावर झाला. त्यामुळे बऱ्याच जणांना आर्थिक आणि मानसिक त्रासातून जावे लागले व त्या मधूनच आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. याच कालावधीत विद्यार्थी,युवक, नोकरदार आणि व्यवसायिक यांचे आत्महत्या वाढले आहेत.
यामध्ये आजारपणामुळे 18 टक्के आणि गरिबीमुळे 1.2 आत्महत्या झाल्याचे अहवालात म्हटले आहे.तसेचकौटुंबिक समस्यांमुळे 33.6 टक्के आत्महत्या झाल्याचे अहवालात म्हटले आहे.यामध्ये 45 ते 60 वयोगटातील आत्महत्यांमध्ये महिलांच्या आत्महत्यांचे प्रमाण 22 टक्के आणि पुरुष आत्महत्यांचे प्रमाण 78 टक्के आहे. ( संदर्भ- सकाळ)
Share your comments