कित्येक वर्षापासून बंद असलेल्या नाशिक सहकारी साखर कारखाना अखेर सुरू होत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड अगदी जोमाने सुरू केली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सध्या या कारखान्याचे नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा कारखाना कार्यान्वित होणार आहे. नासाका भाडे तत्त्वावर सुरू होत असूनया निर्णयाचेपरिसरातील शेतकरी सभासदांनी स्वागत केले आहे. शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिली असूनकारखान्याचे कामगार यांनीदेखील मागणीनुसार वेळोवेळी मदत करण्याची भूमिका स्वीकारली आहे.
नक्की वाचा:सुरवातीला 15 लाखांचे नुकसान; मात्र, आज कमवतोय वर्षाला 40 लाख
सगळ्यांच्या सहकार्याने कारखाना होत आहे सुरू
नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासकीय अधिकारी अरुण कदम यांनी जी भूमिका घेतलीतसेच दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी याकामी दिलेला अनमोल प्रतिसाद,खासदार हेमंत गोडसे त्यासोबतच आमदार सरोज अहिरे यांनी केलेले मोलाचे प्रयत्न यामुळे शेतकरी, कारखान्याचे कामगार तसेच छोटे-मोठे व्यावसायिकांचे जीवनात आनंदाचे वारे वाहू लागले आहेत.
या कारखाना ला लागणारा ऊसाचा आवश्यक पुरवठा करण्याची जबाबदारी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आहे. साठी जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आडसाली तसेच सप्टेंबर ते डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अर्ली सुरू उसाची को.86032 या जातीची जास्त प्रमाणात लागवड करावी. तसेच या शेतकऱ्यांचा खोडवा ऊस आहे, अशा शेतकऱ्यांनी कंपनीच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपर्क साधावा उसाची नोंद करावी.
असे आवाहन करण्यात आले आहे.याबाबतीत नाशिक जिल्हा बँक व कारखाना कामगार युनियन,कामगार सोसायटी,पीएफ फंड कार्यालयांचे प्रश्न व सुप्रीम कोर्टात जमा केलेल्या रकमेबाबत
खा. हेमंत गोडसे त्यांनी संबंधित अधिकारी तसेच सुप्रीम कोर्टातील वकील यांच्यासोबत दिल्लीत बैठक घेऊन लवकरात लवकर कामगारांना व बॅंकेलाही कोर्टातील रक्कम मिळावी यासाठी मध्यस्ती केलेली असून याबाबतीत जिल्हा बँकेने देखील सकारात्मक भूमिका घेतली आहे.(स्त्रोत -सकाळ)
Share your comments