निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात नाशिकच्या शेतकऱ्यांचे आंदोलन

15 September 2020 04:04 PM By: भरत भास्कर जाधव

मोदी सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तातडीने घेतला आहे. या निर्णयाविरोधात नाशिकच्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोकोही करण्यात आला आहे. नाशिकमधील देवळातल्या उमराणे या ठिकाणचे कांदा उत्पादक संतापले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले. लवकरात लवकर ही निर्यातबंदी उठवावी अशी मागणी  संतप्त शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.  

हेही वाचा : केंद्र सरकारकडून तडकाफडकी कांदा निर्यात बंदी

दरम्यान सोमवारी केंद्र सरकारने तातडीने अंमलबजावणी करत निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा निषेध करत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे, त्यामुळे ही निर्यातबंदी मोदी सरकारने मागे घ्यावी,अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे. आम्ही आमच्यातर्फे आजच केंद्राला निर्यातबंदी मागे घेण्याची विनंती करतो आहोत असेही भुसे यांनी स्पष्ट केले आहे. कुणाचीही मागणी नसताना केंद्र सरकारने ही निर्यातबंदी जाहीर केली आहे. हा निर्णय कांदा उत्पादकांवर अन्याय करणारा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

export ban Nashik farmers protest Nashik farmers export ban Movement निर्यातबंदी नाशिक शेतकऱ्यांचे आंदोलन कांदा निर्यातबंदी onion exports ban
English Summary: Nashik farmers protest against export ban Movement

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.