मोदी सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तातडीने घेतला आहे. या निर्णयाविरोधात नाशिकच्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोकोही करण्यात आला आहे. नाशिकमधील देवळातल्या उमराणे या ठिकाणचे कांदा उत्पादक संतापले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले. लवकरात लवकर ही निर्यातबंदी उठवावी अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
हेही वाचा : केंद्र सरकारकडून तडकाफडकी कांदा निर्यात बंदी
दरम्यान सोमवारी केंद्र सरकारने तातडीने अंमलबजावणी करत निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा निषेध करत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे, त्यामुळे ही निर्यातबंदी मोदी सरकारने मागे घ्यावी,अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे. आम्ही आमच्यातर्फे आजच केंद्राला निर्यातबंदी मागे घेण्याची विनंती करतो आहोत असेही भुसे यांनी स्पष्ट केले आहे. कुणाचीही मागणी नसताना केंद्र सरकारने ही निर्यातबंदी जाहीर केली आहे. हा निर्णय कांदा उत्पादकांवर अन्याय करणारा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Share your comments