नाशिक जिल्हा सहकारी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरिता असलेली थकबाकी वसुली करणे खूप आवश्यक असून त्यासाठी कडकपावले उचलण्यात येत आहेत.
यासाठी बँकेचे अधिकारी व कर्मचारी च्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या असून बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला आहे. या कारवाईमध्ये जिल्हा बँकेने 240 वाहने व ट्रॅक्टर जप्त केले असून त्यांचा टप्प्याटप्प्याने जाहीर लिलाव सुरू आहे. याच कारवाईचा भाग म्हणून निफाड तालुक्यातील थकबाकीदार असलेल्या 16 ट्रॅक्टर ची लिलाव निफाड सहकारी साखर कारखाना, भाऊसाहेब नगर येथे झाला. या लिलावाच्या माध्यमातून बँकेने 43 लाख 43 हजार रुपयांची वसुली केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या लीलावा प्रसंगी मोठ्या प्रमाणात खरेदीदार उपस्थित होते.
ज्यांच्याकडे बँकेची थकबाकी होती अशी या थकबाकीदारांना बँकेने वारंवार कर्ज बँकेच्या नोटिसा दिल्या होत्या. परंतु तरीही थकबाकीदारांना थकबाकी भरलेली नसल्यामुळे बँकेला ही कार्यवाही करावी लागली आहे. या लिलाव याप्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक नितीन ओस्तवाल, विभागीय अधिकारी ज्ञानेश्वर वाटपाडे तसेच सहायक विभागीय अधिकारी गरुड व मानकर,वसुली अधिकारी अरुण थेटे, रमेश शेवाळे, तालुक्यातील वसुली अधिकारी तसेच विकास संस्थांच्या सचिव यांचे यावेळी सहकार्य लाभले.एका बाजूला नाशिक जिल्हा बँकेच्या माजी संचालकांनी अनियमित 347 कोटींचे कर्ज वितरण केलेल्या चौकशी प्रकरण सुरू असून कोणत्याही क्षणी त्यांच्याकडून निश्चित केलेल्या रकमेच्या वसुलीसाठी चे प्रमाणपत्र विभागीय सहनिबंधकाकडून जारी केली जाऊ शकते.
तर दुसरीकडे बँकेची चार दोन लाखांचे थकबाकी असलेल्या शेतकर्यांच्या ट्रॅक्टर वाहनांची लिलाव सुरू आहेत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या वसुलीची प्रक्रिया ज्या गतीने सुरू आहे तीच शीघ्रतामाजी संचालक व अधिकाऱ्यांच्या बाबतीत प्रशासन दाखवणार का? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
Share your comments