1. बातम्या

नाशिक जिल्हा बँकेचा दणका! थकबाकीदार शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जिल्हा बँकेच्या नावावर लावण्याची प्रक्रिया सुरू

जर सहकार क्षेत्रातील प्रमुख बँकांचा विचार केला तर यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक या प्राधान्याने ओळखले जातात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
nashik district bank

nashik district bank

जर सहकार क्षेत्रातील प्रमुख बँकांचा विचार केला तर यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक या प्राधान्याने ओळखले जातात.

शेतकऱ्यांना संकटाच्या काळी कर्जपुरवठा करणारी बँक तत्कालीन संचालक मंडळाच्या सदोष कार्य पद्धतीने संकटाच्या दरीत लोटली गेली आहे. कुकुट पालन,वाहन खरेदी, पिक कर्ज इत्यादींसाठी शेतकऱ्यांना बँकेने मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जे दिली होती व या कर्जाची थकबाकी प्रचंड प्रमाणात वाढले आहे. जवळ जवळ ही थकबाकी दोन हजार कोटींच्या घरात पोहोचली असून यामध्ये दीड हजार कोटी रुपयाची जुनी थकबाकी आहे. या सगळ्या थकबाकीमुळे बँक अडचणीत आली असून बँकेला दैनंदिन व्यवहार करणे देखील अडचणीचे होत आहे.बँकेने असलेली ही थकबाकी वसूल करण्यासाठी शेत जमिनी तसेच ट्रॅक्टर व अन्य वाहनांची लिलाव प्रक्रिया सुरू केली होती.

यामध्ये 113 ट्रॅक्टर चे लिलाव टप्प्याटप्प्याने केले जात आहेत व त्याला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी शेतजमिनीच्या खरेदीसाठी कोणी प्रतिसाद देत नसल्याने बँकेच्या सूत्रांनी सांगितले.शेवटी बँकेने अशा शेतजमिनींवर बँकेचे नाव लावण्याची प्रक्रिया सुरू केली असून टप्प्याटप्प्याने ही प्रकरणे पुढील कारवाईसाठी विभागीय सहनिबंधकांकडे पाठवली जात आहेत. गेल्या वर्षभरापूर्वी बँकेने शेतजमिनीच्या लिलावासाठी प्रयत्न केले होते परंतु याला काही संघटनांनी विरोध केला. थकबाकी वसूल करण्यासाठी जिल्हा बँकेने 690 जमिनींची लीलावप्रक्रिया राबवली. परंतु या लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही.

यामध्ये काहीशेतजमिनींचे लिलावाचे प्रकरण प्रकरण पहिल्या व दुसऱ्या लिलावाच्या टप्प्यात आहे. तीन वेळा लिलावाला प्रतिसाद न मिळालेल्या शेतजमिनींवर बँकेचे नाव लावण्यासाठीची प्रक्रिया केली जाते. यामध्ये आतापर्यंत बँकेने 366 शेतजमिनींवर बँकेचे नाव लावण्यासाठी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे  प्रस्ताव सादर केले आहेत.

English Summary: nashik district bank take action against loan pending farmer through auction Published on: 10 March 2022, 10:21 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters