केंद्र सरकारने किसान रेल्वे सुरू करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला देशाच्या कानाकोपऱ्यात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न केले. याची किसानरेल्वेच्या माध्यमातून विविध प्रकारचा भाजीपाला तसेच फळ पिके देशाच्या कानाकोपऱ्यात बाजारपेठेत पोहोचवले जातात.
हा शेतमाल या रेल्वेच्या माध्यमातून कमी वेळेत पोहोचत असल्याने त्याची प्रत उत्तम राहते व त्याला बाजारपेठेत चांगला भाव मिळतो व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना निश्चितच चांगला आर्थिक फायदा मिळतो. आपल्या देशातील प्रसिद्ध असलेला आणि जी आय मानांकन मिळालेला डहाणूतील घोलवड आणि आजूबाजूच्या परिसरातील चिकू किसान रेल्वेच्या माध्यमातून दिल्लीच्या बाजारपेठेत अवघ्या चोवीस तासात पाठवण्यात आला आहे. या चिकुला आता योग्य ती बाजारपेठ उपलब्ध होत असल्यामुळे शेतकर्यांना चांगला भाव मिळत आहे. तसेच वाहतुकीमध्ये होणारे नुकसान देखील टळत आहे.
या परिसरातील प्रामुख्याने डहाणू, वाणगाव तसेच घोलवड येथील चिकू हा विदेशातही प्रसिद्ध असून तेथे त्याला चांगली मागणी आहे. परंतु कोरोना कालावधीमध्ये चिकू उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा संकट ओढवलं होतं कारण नाशवंत असलेला चिकू हा वेळेत बाजारपेठेत पोहोचत नसल्यामुळे त्याचा मोठा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसत होता. परंतू किसान रेल्वेने अगदी कमी वेळेत या चिकुला बाजारपेठ उपलब्ध झाल्याने होणारे नुकसान टाळता येतअसून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.
अगोदर येथील चिकूची ट्रॅकच्या माध्यमातून वाहतूक होत होती त्यामुळे दिल्लीसाठी पोहोचायला चौतीस तास लागत होते. किसान रेल्वेने हा चिकू दिल्लीत पाठवल्याने तो अवघ्या चोवीस तासात पोहोचत असल्याने वाहतुकीच्या खर्चात बचत झाली आहे.
Share your comments