नासाच्या वैज्ञानिकांनी कृषी क्षेत्राबाबत एक अहवाल सादर केला आहे त्या अहवालामध्ये असे काय चित्र दिसले आहे की या दशकात ग्लोबल वॉर्मिंगमुळे कृषी क्षेत्रावर परिणाम दिसणार आहे. जगात सर्वात महत्वाचे पीक म्हणजे मका चे पीक. २०३० पर्यंत या पिकात २० टक्यांनी घट होणार आहे असे चित्र या अहवालात दिसणार आहे तसेच याच काळामध्ये गहू चे उत्पादन १७ टक्के नी वाढणार आहे असेही त्या अहवालात उल्लेख आहे.
चीन, ब्राझील आणि अमेरिका हे जगात सर्वात जास्त मक्याचे उत्पादन घेणारे देश:
जगभरात मक्याला महत्वाचे स्थान दिले जाते मात्र हे असेच जर तापमान वाढत राहिले तर या दशकात मक्याचे (maize)उत्पादन २० टक्यांनी घटणार आहे.नासाच्या वैज्ञानिकांनी कॉम्प्युटर माॅडेलिंगद्वारे जगातील अपेक्षित तापमान वाढ तसेच पावसाचा पॅटर्न व वातावरणात वाढते ग्रीन हाऊस गॅसेसचे काॅन्सन्ट्रेशन याचा सर्वांचा अभ्यास करून अहवाल सादर केला आहे. चीन, ब्राझील आणि अमेरिका हे जगात सर्वात जास्त मक्याचे उत्पादन घेणारे देश आहेत, याव्यतिरिक्त भारत आणि मध्य आशियामध्ये सुद्धा मक्याचे पीक घेतले जाते. परंतु हवामान पाहता एक धोक्याचा इशारा दिला आहे. नासाच्या अभ्यासानुसार दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उत्पादन घसरणार आहे.सध्या सर्वच देश जागतिक तापमान वाढ मर्यादित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या बदलत्या तापणामुळे आणि हवामानामुळे कृषी क्षेत्राला याचा सामना करावा लागत आहे.
गव्हाचे उत्पादन १७ टक्क्यांनी वाढेल:
नासाने जो अहवाल सादर केला आहे त्यामध्ये जी सकारात्मक बाब जी आहे ती अशी की जगात दुसऱ्या क्रमांकावर होणाऱ्या गहू च्या उत्पादनात १७ टक्केनी वाढ होणार आहे असे त्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. येणाऱ्या उच्च तापमान वाढीच्या जगात गहुचे उत्पादन वाढणार आहे.
भाताचे उत्पादन वाढेल?
भात पिकाला खूप पाणी लागते आणि वाढत्या तापमानामुळे पाऊस पडण्याची शक्यता दाट असते त्यामुळे भात पिकाला जशी अनुकूल परिस्थिती पाहिजे त्या प्रकारे परिस्थिती निर्माण होईल आणि भाताचे उत्पादन चांगल्या प्रकारे वाढेल असा दावा नासाच्या वैज्ञानिक वर्गाने केला आहे. परंतु अतिवृष्टी झाली तर भात पिकाला नुकसान झेलावे लागते.
Share your comments