केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी असा दावा केला आहे की शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुमारे दहापट वाढ झालेली आहे. एवढेच नाही तर गावागावात आधुनिक तंत्रज्ञानाचा जागर करून दिला पाहिजे म्हणजे सर्व शेतकऱ्यांचा विकास होईल असे सुद्धा नरेंद्रसिंह तोमर म्हणले आहेत. नरेंद्र सिंह तोमर यांनी 'किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी' या मोहिमेचा शुभारंभ करताना बोलले. २०१६ - २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न व्हावे हे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे.
केंद्राच्या योजनांमुळे शेतकरी समृद्ध झाला :-
सरकारच्या कृषी योजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकरी आता समृद्ध झालेला आहे. मागील पाच ते सहा वर्षाने शेतकऱ्याचे शेती उत्पन्न दुप्पट वाढलेले आहे. जर शेतकऱ्यांनी दुसऱ्या गावी जाऊन जर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर सर्वच शेतकरी समृद्ध होतील. बाजारात शेतकऱ्यांचा मालाला चांगला भाव देखील मिळत आहे. गहू आणि मोहरी या पिकांना बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे. मोहरीच्या तेलामध्ये जी भेसळ होत होती ती थांबल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी अजून अशीच पावले उचलणार असल्याचे तोमर म्हणतात.
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सुधारणार :-
ग्रामीण भागामध्ये पायाभूत समित्यांची तरतूद करण्यासाठी केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांची तरतूद देखील केलेली आहे. जे की आठ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प देखील मंजूर झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी इतर सुविधांचा विकास देखील करण्यात आलेला आहे. तसेच तोमर यांनी सांगितले की सरकारच्या कृषी क्षेत्राशी असलेल्या संबंधित योजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतकऱ्याची प्रगती झालेली आहे तसेच शेतकऱ्यांच्या कुटुंबाची देखील प्रगती झालेली आहे.
हरितक्रांतीमध्ये या राज्यांचे मोठे योगदान :-
शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर केला असल्याने शेतजमिनीचा पोत बिघडला आहे, तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण देखील घटले आहे. रासायनिक खतांचा पुरवठा करण्यासाठी देशाला आयात करावी लागते. एक काळ असा होता जेव्हा देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा होता. जे की हरितक्रांतील सुरुवात झाली आणि रासायनिक खते वापरणी सुरू झाली. ही हरितक्रांती यशस्वी करण्यात पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या राज्यांचे मोठे योगदान आहे असे कृषी कल्याणमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणतात.
Share your comments