नॅनो युरियाच्या महाराष्ट्रातील खत वितरणाचा शुभारंभ काल कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते व्हीसी प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. आज पासून या नॅनो युरिया खताचे वितरण महाराष्ट्रात होणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले
तसेच हा युरिया शेतकऱ्यांसाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नॅनो युरियाच्या महाराष्ट्र कडे येणाऱ्या ट्रकला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी विषय प्रणालीद्वारे पार पडलेल्या या कार्यक्रमात कृषी मंत्री दादा भुसे यांनी मार्गदर्शन करताना कंपनीच्या या कामाचेआणि उत्पादनाचे मोठे कौतुक केले.
पुढे बोलताना ते म्हटले की इफको च्या उत्पादनांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो त्यामुळे इफकोने महाराष्ट्रात यावे अशा पद्धतीचे आमंत्रण कृषिमंत्री यांनी दिले. यावेळी बोलताना कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले की हे नवीन स्वरूपातील द्रवरूप युरिया खत पारंपारिक युरिया पेक्षा स्वस्त आणि हाताळण्यास सुलभ असून त्यामुळे प्रदूषण रोखण्यास मदत होणार असल्याचे ते म्हटले.
इफकोने शेतकऱ्यांसाठी 31 मे रोजी नॅनो युरिया लॉन्च केला होता. इफको च्या 50 व्या वार्षिक बैठकीत याचा लॉंचिंग करण्यात आले होते. नॅनो युरिया हा शेतकऱ्यांना द्रव स्वरुपात उपलब्ध होणार असून त्याच्या 500 मिली मध्ये 40 हजार पीपीएम एवढा नायट्रोजन असतो.
त्यामुळे युरिया 50 किलो बागे मध्ये असलेले पोषक तत्त्वं इतकी तत्त्वेयामधून मिळतील. अलिकडच्या काळात आपण विचार केला तर रासायनिक खतांच्या किमती या भरमसाठ वाढलेले आहेत. त्यामुळे अशा काळात नॅनो युरिया हा शेतकऱ्यांसाठी सामान्य युरियाला चांगला पर्याय ठरणार आहे. हा युरिया बॉटल मध्ये उपलब्ध असल्याने त्याच्यावरचा वाहतुकीचा खर्च देखील कमी होणार आहे.
Share your comments