खरीप हंगामामध्ये सगळ्या महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले. सगळे पिके हातची चालली गेली.
ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता अशा शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी यासाठी मागणी केली होती. बऱ्याच कालावधीनंतर दीपावलीच्या कालावधीमध्ये या नुकसान भरपाईची 75% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. परंतु यातील 25% उरलेली रक्कम जमा व्हायची बाकी होती. परंतु आता मराठवाड्यातील उस्मानाबाद पाठोपाठ आता नांदेड जिल्ह्यासाठी 331 कोटी रुपये मंजूर झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले व उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जर आपण नांदेड किंवा उस्मानाबादचा नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर येथील सगळ्यात मुख्य पिक हे सोयाबीन आहे.
नक्की वाचा:दुग्धव्यवसायाला द्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, मग नाही कसल्याही नोकरीची गरज
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका या पिकाला बसला होता. पिकांचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे तसेच पीक पाहणी त्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये 75 टक्के निधी हा शेतकऱ्यांना देण्यात आला होता व उरलेला 25 टक्के निधी हा पुढील टप्प्यामध्ये देण्यात येईल असे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
नक्की वाचा:काय सांगता! गायींना गाणी ऐकवली तर दूध जास्त देतात? खरी माहिती आली समोर..
त्यामुळे उर्वरित आता 331 कोटी रुपये पीक विम्यासाठी मंजूर झाले आहेत. हे मंजूर रक्कम येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. विमा कंपन्यांकडून निधीची पूर्तता होताच निधीचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचा विचार केला तर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर उरलेली 25 टक्के रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमतालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे.
Share your comments