Maharashtra Politics : एकनाथ शिंदे गटाने (Shinde Group) पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तीन नावांचा पर्याय दिला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या तिन्ही नावांमध्ये बाळासाहेब यांचा उल्लेख आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिंदे गटाची नाव
१. बाळासाहेब ठाकरे
२. बाळासाहेबांची शिवसेना
३. शिवसेना बाळासाहेबांची
अशा तीन नावांचा पर्याय देण्यात आला आहे.
शिवसेनेचे धनुष्यबाण गोठवलं; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिंदे गटाची काल वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत देखील शिंदे गटाने नवीन चिन्ह आणि नावाबाबत चर्चा केली. शिंदे गटाने बंड केल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता.
त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले आहे. आता, निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या बद्दलच्या रंजक गोष्टी; जाणून घ्या
शिंदे गटाने आज निवडणूक आयोगाकडे चिन्ह संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. यात त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा चिन्ह निश्चित करण्यात आली आहेत.
यात त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही चिन्ह ठाकरे गटानेही दिली आहेत. त्यानंतर आता त्रिशूळ आणि उगवता सूर्य या चिन्हावर शिंदें गटानेही दावा केला आहे. त्यामुळे या चिन्हांवरुनही दोन्ही गटात वाद होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्याच्या लहान मुलाचे मुख्यमंत्र्यांना भावनिक करणारे पत्र, सोशल मीडियावर व्हायरल
Share your comments