देशात कोरोना व्हायरसने (covid-19) हाहाकार माजवला आहे. या आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकार लॉकडाऊन वाढविण्याच्या विचारात आहे. या लॉकडाऊन दरम्यान शेतीचे कामे आणि शेती संलग्न असलेल्या कामांना यातून सूट देण्यात आली आहे. पण यासह शेतकऱ्यांनी दक्षता बाळगावी असे सांगण्यात आले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून तर शेतीची कामे करताना शेतकऱ्यांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याच्या सुचना दिल्या आहेत. यासाठी नाबार्डने (NABARD) शेतकऱ्यांना मदत करण्याचे ठरविले असून शेतकऱ्यांसाठी मोफत मास्क देण्याचे ठरवले आहे.
यासाठी नाबार्डच्या अधिपत्याखाली काम करणारे चंपारण येथील युथ वेलफेअर सोसायटी हे मास्क बनवणार आहे. येथील कामगार विशेषत महिला ह्या हे मास्क बनवणार आहेत. नाबार्ड (NABARD) नेहमी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी निरनिराळे निर्णय घेत असते. जेणेकरुन शेतकऱ्यांचा विकास होईल.
नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक गोपाल कुमार पंडित याच्या सुचनेनुसार, चंपारणमधील डोणे गावातील आदिवासी लोक हे मास्क बनवत आहेत. हे मास्क गरिब आणि शेत मजुरांना मोफत दिले जाणार आहेत. हे मास्क वाटण्याची जबाबदारी चंपारण युवा कल्याण सोसायटीचे मोहम्मद बदुरुद्दीन यांच्याकडे आहे. बनविण्यात आलेले मास्क नौरंगिया डोणे पंचायतमधील लोकांना देण्यात आले आहेत. यासह सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही हे मास्क देण्यात आले आहेत. कपड्यापासून बनविण्यात आलेले मास्क हे कोरोना विषाणूंपासून वाचविण्यास सक्षम असल्याचे मोहम्मद बदुरुद्दीन यांनी सांगितले.
Share your comments