देशातील शेतकऱ्यांवर अनोखं संकट आले आहे, कारण देशातील बियाणे वारसा आणि बिजोत्पादन उद्योग दूषित होऊ न देण्यासाठी केंद्र सरकार सरकारला तातडीने ठोस पावले उचलावी लागतील. सरकारने प्रत्येक राज्यातील बीजोत्पादन उद्योगांना सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला. अज्ञात स्थळावरून बियाणे भारतात येत असल्याने शेतकऱ्यांना भीतीचे वातावरण आहे.
भारतीय बियाणे संघटनेचे संचालक (एनएसएआय) इंद्रा शेखर सिंग यांनी माध्यमांनी सांगितले की, भारतीय बियाणे कंपन्यांना चीनमध्ये मनाई आहे. मात्र, चीनी कंपन्या भारतात सर्व प्रकारचे संशोधन शास्त्रीय चाचण्या, उत्पादन आणि व्यापारी कामे सर्रास करीत आहेत. या चीनी कंपन्या कोणत्या हे सर्वांना माहीत आहे. पण त्या भारतात नेमके काय करीत आहेत, भविष्यात बियाणे व्यवस्थेला कोणता धोका आहे, याचा आढावा तातडीने सरकारनेच घ्यायला हवा. जागितक बियाणे संघटनेने चीनी बियाणे दहशतवादाच्या अस्तित्वाचे संकेत दिले आहेत. अमेरिका, कॅनाडा, ब्रिटेन, न्युझीलँड, जपान, आणि इतर युरोपियन देशातही संशयित बियाण्यांच्या बातम्या आल्या आहेत.
भारत सरकारला बियाणे क्षेत्रातील तस्करी संकटाबाबत जागृत करण्याचा निर्णय जागतिक बियाणे परीक्षण संघटनेने घेतला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. जागतिक बियाणे परीक्षण संघटनेच्या सदस्यांना अमेरिकेत बियाण्यांबाबत काही धक्कादायक घडोमोडी आढळून आल्या आहेत. हे बियाणे आजार पसरवणारे बीज असू शकतात. यामुळे देशातील जैव विविधतेसाठी धोका पोहचू शकतो. अमेरिकेच्या कृषी विभागानुसार, हे बियाण्यांचा पार्सल परदेशी आक्रमक प्रजाती बिज या रोगांचा प्रसार करण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. यामुळे पर्यावरण, कृषी क्षेत्र आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान या आलेल्या बियाण्यांच्या पार्सल पाठवण्याचा स्रोत आधी सापडत नव्हता मात्र, चौकशी केल्यानंतर बियांण्याचे मुळ चीनमध्ये असल्याचे आढळू आले आहे. हा बियाणे दहशतवादाचा प्रकार असल्याचा निष्कर्ष बियाणे उद्योगाने काढला आहे, असे बियाणे उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे.
Share your comments