1. बातम्या

माझं मत - 'शेतकरी श्रीमंत का होत नाही? दुर्बलता काय...?

KJ Maharashtra
KJ Maharashtra
माझं मत - 'शेतकरी श्रीमंत का होत नाही? दुर्बलता काय...?

माझं मत - 'शेतकरी श्रीमंत का होत नाही? दुर्बलता काय...?

आपला देश हा कृषिप्रधान देश आहे असं आपण सातत्याने म्हणत असतो, आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आणि कृषि क्षेत्रावर अवलंबून आहे हे ही खरेच आहे पण मात्र हाच प्रश्न शेतकऱ्याला विचारला तर त्याचे उत्तर हे आपला देश व्यापारीप्रधान आहे असे येईल. कारण या देशात शेतकऱ्याला महत्व देण्यापेक्षा व्यापाऱ्याला जास्त महत्त्व दिले जाते, व्यापाऱ्यांचा विचार केला जातो,असो.

शेतकऱ्यांच्या तश्या अनेक समस्या व दुर्बलता आहेत जसे की शेतकरी संघटीत होऊ शकत नाही, या देशात शेतकऱ्याला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते, शेतकरी एका शेतीवर दुसरी शेती घेऊ शकत नाही, कृषीपंपासाठी वीज दिवसा मिळत नाही, योग्य भाव मिळत नाही, अश्या अनेक समस्या ह्या शेतकऱ्यांसमोर आहेत परंतु मात्र प्रमुख समस्या आणि दुर्बलता काय असेल तर ती म्हणजे शेतकऱ्याच्या हातात खेळता पैसा राहत नाही, म्हणजे जगात "शेती" हा एकमेव असा व्यवसाय आहे की शेती करत असताना त्याला शेतीच्या खर्चासाठी पैसा राहत नाही त्याला तो दुसऱ्याकडून म्हणजे कर्ज घ्यावे लागते किंवा कृषि निविष्ठा उधारित घ्याव्या लागतात,त्यामुळे शेतकरी घरातील व्यक्तींच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे जर शेतकऱ्याला श्रीमंत व्हायचं असेल तर सेंद्रिय शेतीकडे,नैसर्गिक शेतीकडे वळावे लागेल.

 

याचे कारण शेती करतांना जो खर्च येतो तेव्हढेच उत्पन्न शेतकऱ्याला होत आहे त्यामुळे शिल्लक पैसा कुठून येणार? त्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेतीची कास धरावी लागेल. तेव्हाच शेती परवडेल असं म्हणता येईल, आपण शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे रासायनिक खतांचा भडीमार वापर केला आणि मातीतील उपयोगी जिवाणू नष्ट केले. आणि जर आपल्या पिढीसाठी जमिनी सुपीक आणि सजीव ठेवायच्या असतील तर सेंद्रिय शेती हा एकच उपाय. शेतकऱ्याने सर्वप्रथम मेंढरासारखं वागणं सर्वप्रथम बंद केले पाहिजे.

हेही वाचा : माझं मत- 'चला शेतीचा उत्पादन खर्च कमी करूया'

कारण शेजाऱ्यांनी केले म्हणून मी पण तेच करणार हा स्वभाव बदलला पाहिजे.आणि आपण नवे प्रयोग शेतीमध्ये करून बघितले पाहिजे. शक्यतो खर्च शक्यतो खर्च बचत धोरण राबवा व त्याचबरोबर नैसर्गिक/सेंद्रिय शेतीचे महत्व समजून घ्या.

 

आपल्याला पिक्या होण्याबरोबरच वीक्या चागल्या पद्धतीचा व्हावं लागेल. शेतातील कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करून विकला तर आर्थिक सुबत्ता पण येईल. शेवटी आपली काळी माय आपल्याला श्रीमंत बनवू शकते यावर विश्वास ठेवू आणि निष्ठा ठेवून शेती करू. जय जवान जय किसान.
गोपाल न.उगले
कृषी महाविद्यालय अकोला.
संपर्क-9503537577

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters