गेल्या काही दिवसांपासून या कोरोना महामारीने जगभर थैमान घातलेले आहे आणि कोरोना मुळे बऱ्याच लोकांना प्राण गमवावे लागले आहेत त्यामुळे आपल्या प्रत्येकाला कोरोना रोगाने भरपूर काही शिकवले आहे. त्यामधे आपले आणि पर्यावरणाचे कीट जवळचे संबंध आहेत हेही समजुन घेतले पाहिजे.
आपण सध्या बघत आहोत सरकारकडे धान्य साठा भरपूर आहे जनतेला जगवण्यासाठी परंतु मात्र जनतेला जगविण्यासाठी ऑक्सीजन मात्र कमी पडत आहे,ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे झाडे लावणे हेच आले मूलभूत कर्तव्य हे गोष्ट आपल्याला समजून घ्यावे लागेल. कारण अनेक जीव हे झाडांच्याच भरवश्यावर जगत आहेत. या कोरोना महामारी मुळे या जगाला आणखी एक महत्वाची शिकवण मिळाली असेल की ती म्हणजे माणूसच माणसाचा शत्रू आहे. कारण शासन जमावबंदी करत आहे म्हणजे एका ठिकाणी जर अनेक व्यक्ती दिसली किंवा मास्क न घातलेली व्यक्ती त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहे तर आता लोकांनी करायचे तरी काय तर या वेळेमध्ये आपल्याला पर्यावरण संवर्धन आणि झाडे लावण्याची गरज आहे.
आपण काहीच दिवस झाडांना आपला मित्र बनवू मग नंतर झाडच आपल्याला काही दिवसांनंतर प्रेम देईल. आणि अशी वेळ आलेली आहे आता पर्यावरणाची जोपासना करण्याची. ज्या पद्धतीने हे जग झपाट्याने वाढत चालले आहे आणि मोठ्या पद्धतीने वायू प्रदूषण होत आहे. सध्या हे जग पैसा कसा कमावण्यामाघे लागले आहे. परंतु आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल. आणि त्यासाठी निसर्ग आपल्याला जवळचा करावा लागेल. जसे तुम्ही या दीड वर्षांपासून कोरणा मुळे मास्क घालत आहे तसे तुम्ही जर पर्यावरणाची जोपासना करावी लागेल.म्हणजे आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या शेताच्या बांधावर ठीकठिकाणी झाडे लावावी लागेल. जेणेकरून आपल्याला काही दिवसांनी ऑक्सिजन घेण्यासाठी स्वतःच्या पाठीवर सिलेंडर घेऊन जगावे नाही लागणार.
वैज्ञानिकदृष्ट्या एका व्यक्तीला जगण्यासाठी चार झाडांची गरज असते. एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे . 2011 च्या जनगणनेनुसार या भारतामध्ये 121 कोटी जनता आहे तर प्रत्येकाने चार झाडे जर स्वतः लावली तर विचार करा कोट्यावधी झाडे या भारतात नव्याने निर्माण होतील आणि त्यावेळेस निरोगी श्वास माणूस घेऊ शकेल . ही गोष्ट गावातील लोक करतातच परंतु शहारातील लोकांनी या गोष्टीला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये सम - विषम संख्येच्या गाड्यांची पद्धत लावलेली आहे त्याचप्रमणे संपूर्ण भारतभर ही पद्धत आवलंबली पाहिजे.
गोपाल उगले
मो -9503537577
Share your comments